राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने रविवार, २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या (76th Republic Day) संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे दहा हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विविध पार्श्वभूमी असलेल्या ‘स्वर्णिम भारत’च्या (‘Golden India’) या शिल्पकारांमध्ये विविध क्षेत्रांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा आणि सरकारी योजनांचा सर्वोत्तम वापर करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. सरकारच्या निवडक उपक्रमांमध्ये ज्या गावांनी निर्धारित लक्ष्य साध्य केली आहेत, अशा गावांच्या सरपंचांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जाहीर केली होती. ज्या पंचायतींनी सरकारच्या किमान सहा प्रमुख योजनांमध्ये लक्ष्य साध्य केले. आहे, त्यांची विशेष अतिथी (Special Guest on Republic Day) म्हणून निवड करण्यात करण्यात आली. (Republic Day 2025)
निमंत्रित पाहुण्यांपैकी काहीजण बचतगटांच्या माध्यमातून उत्पन्न आणि रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी असामान्य कार्य करत आहेत. अन्न, पोषण, आरोग्य, पाणी स्वच्छता आणि स्वच्छता, पंचायती राज संस्था-समुदाय आधारित संघटना, अभिसरणं आणि महिलांशी संबंधित क्षेत्रातील उपक्रम यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या बचतगटांना आमंत्रित करण्यात आले आहे. दिल्लीला भेट न दिलेल्या बचतगटांच्या सदस्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘पीएम-जनमन मिशन’ सहभागी, ‘आदिवासी कारागीर/वनधन विकास योजना’ सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आदिवासी अर्थसाहाय्य आणि विकास महामंडळ उपक्रम, आशा सेविका, मायभारत स्वयंसेवक यांना निमंत्रित केले आहे.
(हेही वाचा – Dyanradha Multistate Fraud प्रकरणी ED ने सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात)
आपत्ती निवारण आणि पर्यावरण रक्षण (Environmental protection) या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपत्ती निवारण कर्मचारी, पाणी समिती, जलयोद्धे, सामुदायिक संसाधन व्यक्ती, वन आणि वन्यजीव संवर्धन स्वयंसेवकांना प्रथमच निमंत्रित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाला पाठबळ देणारे आणि ‘पीएम सूर्यघर योजना’ (PM Suryaghar Yojana) आणि ‘पीएम कुसुम योजना’ (PM Kusum Yojana) अंतर्गत नवीकरणीय ऊर्जेचा वापर करणारे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे.
(हेही वाचा –Ram Mandir Ayodhya: रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; असं असेल ‘या’ तीन दिवसीय सोहळ्याचे नियोजन)
आपापल्या क्रीडा प्रकारात देशाला अभिमानास्पद कामगिरी करणारे पॅरा-ऑलिम्पिक (Para-Olympic athlete) पथकातील सदस्य, बुद्धिबळ ऑलिम्पियाड पदक विजेते, ब्रिज वर्ल्ड रोम्स रौप्य पदक विजेते आणि स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्ण पदक विजेते यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. नवोन्मेष आणि उद्यमशीलतेच्या भावनेला प्रोत्साहन देत पेटंटधारक आणि स्टार्ट-अप्सनादेखील विशेष पाहुणे म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे, अखिल भारतीय शालेय बँड स्पर्धा आणि वीर गाथा स्पर्धेतील विजेते ठरलेले देशभक्तीची भावना असणारे शालेय विद्यार्थीदेखील प्रजासत्ताक दिन समारंभात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभांव्यतिरिक्त, हे विशेष पाहुणे राष्ट्रीय युद्ध स्मारक, पंतप्रधान संग्रहालय आणि दिल्लीतील इतर प्रमुख ठिकाणांना भेट देतील. त्यांना संबंधित मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधीदेखील मिळणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community