Republic Day 2025 : ७६वा प्रजासत्ताक दिन सावरकर स्मारक भगूर येथे साजरा

102
भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब निकम (मुंबई) व भगूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दाखने यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. कार्यक्रमादरम्यान निकम यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. यावेळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनीही आपली उपस्थिती नोंदवली.
bhagur 2
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार स्मारक समितीच्या वतीने भूषण कापसे, आकाश नेहरे, मनोज कुवर, आणि खंडू रामगडे यांनी केला. मान्यवरांना आकाश नेहरे यांनी सावरकर स्मारक व त्याचा ऐतिहासिक वारसा याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बुरके यांनी उत्कृष्टरीत्या केले. भगूरमधील नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी या ऐतिहासिक स्थळाच्या अभिमानाची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाने उपस्थित सर्वांच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक दृढ केली. (Republic Day 2025)
bhagur1
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन देशसेवेचे महत्व व त्यागाची जाणीव झाली. प्रत्येक भारतीयाने या स्थळाला भेट देऊन देशप्रेमाची प्रेरणा घ्यावी.
– आबासाहेब निकम, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई

अखंड भारताचे प्रेरणास्थान असलेल्या सावरकरांच्या विचारांनी पावन झालेल्या भगूर भूमीला भेट देणे हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे. या स्थळाला भेट दिल्याने देशभक्तीची ऊर्जा मिळते.

– संजय पिसे, पोलीस निरीक्षक, देवळाली कॅम्प
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.