Republic Day 2025 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये जेष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे हस्ते ध्वजारोहण

661
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये रविवार, २६ जानेवारीला 76 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित होत्या. शाळेचे संचालक रणजित सावरकर यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी प्रस्ताविकातून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. रणजित सावरकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे मृणाल कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. ध्वजारोहणानंतर प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना संबोधित केले. मार्गदर्शन करतानांना त्या म्हणाल्या की, देशभक्त नागरिक घडवित असलेल्या शाळेत प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2025) प्रमुख पाहुणे म्हणून आल्याचा विशेष आनंद आहे. या शाळेत प्रवेश घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून त्या भारावून गेल्या. आणि सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक केले. इथला विद्यार्थी शिस्तीत शालेय शिक्षणाबरोबर देशाला उपयोगी शिक्षण घेत आहे. याबद्दल खूपच आदर आहे. आणि तुमच्या हातून देशासाठी चांगले होत आहे. हे पहायचे आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमास रुचिर कुलकर्णी, चित्राताई सावरकर, देवेंद्र गंद्रे, रुपाली गंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने पालक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देसले यांनी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.