भारत यावर्षी २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवांमधील 942 जवानांना शौर्य आणि वीर पुरस्काराने (Gallantry Award) सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये 95 सैनिकांना शौर्य पदके, 101 जवानांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक, 746 जवानांना उत्कृष्ट सेवेसाठी पदके प्रदान करण्यात येणार आहे. (Republic Day Awards 2025)
(हेही वाचा – Weather Update: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, मात्र कोकण अन् मध्य महाराष्ट्रात तापमानात होणार वाढ, IMD ने काय दिला इशारा?)
कोणत्या विभागाकडून किती शौर्य पुरस्कार?
सर्वाधिक ९५ शौर्य पुरस्कार (Gallantry Award) नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या सैनिकांना देण्यात येणार आहे. यामध्ये नक्षलग्रस्त भागातील 28, जम्मू-काश्मीर भागातील 28, ईशान्येकडील 03 सैनिक आणि इतर भागातील 36 जवानांना त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. 78 पोलीस आणि 17 अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
विशेष सेवा, कोणत्या विभागाचे किती शिपाई?
विशिष्ट सेवेतील पुरस्कारासाठी (President’s Medal for Distinguished Service) 101 राष्ट्रपती पदकांपैकी (पीएसएम) पैकी 85 पोलीस सेवेला, 05 अग्निशमन सेवेला, 07 नागरी संरक्षण-होमगार्ड आणि 04 सुधारणा विभागाला देण्यात येणार आहेत. गुणवंत सेवेसाठी (MSM) 746 पदकांपैकी 634 पदके पोलीस सेवेसाठी, 37 अग्निशमन सेवेसाठी, 39 नागरी संरक्षण-गृहरक्षकांना आणि 36 सुधारात्मक सेवेसाठी देण्यात येणार आहेत.
राज्यनिहाय वीर पुरस्कारांची यादी
वीर पुरस्कारांसाठी (Veer Award) राज्यनिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास, हा पुरस्कार छत्तीसगडमधील 11, ओडिशातील 6, उत्तर प्रदेशातील 17 आणि जम्मू-काश्मीरमधील 15 पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आला. तर आसाम रायफल्सच्या एका, बीएसएफच्या 5, सीआरपीएफच्या 19 आणि एसएसबीच्या 4 जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेश अग्निशमन विभागाच्या 16 जवानांना आणि जम्मू-काश्मीरच्या अग्निशमन विभागाच्या एका जवानाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
(हेही वाचा – “ट्रम्प २०२० साली हरले नसते तर…” ; Vladimir Putin यांनी ट्रम्प यांचा उल्लेख करत केलं मोठं विधान)
विशिष्ट सेवेअंतर्गत राज्यनिहाय यादी
विशिष्ट सेवा (President’s Medal for Distinguished Service) यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, केरळ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, पुद्दुचेरी, आसाम रायफल्स, NSG, ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, NDRF, NCRB, संसदीय कामकाज मंत्रालय RS. सचिवालय, रेल्वे संरक्षण, कर्नाटक, ओडिशा, मध्य प्रदेश (सुधार सेवा) आणि उत्तराखंड यांना प्रत्येकी एक पुरस्कार देण्यात येणार आहे.
विशिष्ट सेवेअंतर्गत बिहार, गुजरात, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, CISF, SSB, केरळ (अग्निशमन विभाग), ओडिशा-उत्तर प्रदेश (होमगार्ड) यांना प्रत्येकी दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. तर विशिष्ट सेवेअंतर्गत, बिहार, गुजरात, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, CISF, SSB, केरळ (अग्निशमन विभाग), ओडिशा-उत्तर प्रदेश (होमगार्ड) यांना प्रत्येकी दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. दिल्ली पोलीस ITBP, उत्तर प्रदेश (सुधार सेवा) यांना प्रत्येकी 3, मध्य प्रदेश, महाराष्ट्राला प्रत्येकी 4, उत्तर प्रदेश पोलीस आणि BSF यांना प्रत्येकी 5, CRPF-CBI 6, IB 8 पुरस्कार देण्यात आले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community