- प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजावतरणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. (Republic Day)
(हेही वाचा – राज्यात चाललंय तरी काय? गेल्या तीन महिन्यांत १०८५ कोटींचा Cyber fraud)
दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त कमिशनर असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनी अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, तसेच खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवली आहे. ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे. (Republic Day)
(हेही वाचा – Ashish Shelar यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, बाळासाहेबांना पुरात…)
ध्वजारोहण दरम्यान पुष्पवृष्टी करणार
26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती ध्वजावतरण करतील त्यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी विमानातून पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख यांना सोपविली आहे. (Republic Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community