Republic Day : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावला

74
Republic Day : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावला
Republic Day : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावला

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना (Dharam Veer Meena) यांनी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील मध्य रेल्वे मुख्यालयात राष्ट्रीय झेंडा फडकावला. रेल्वे सुरक्षा दलाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना (Dharam Veer Meena) यांच्या समोर गार्ड ऑफ ऑनर दिला आणि तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले.

सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि आदरणीय ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा देताना, महाव्यवस्थापक म्हणाले की, मध्य रेल्वेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण भारतीय रेल्वे दि. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या पूर्णतेचा ऐतिहासिक टप्पा साजरा करत असताना मध्य रेल्वेवर १००% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. (Republic Day)

(हेही वाचा – Uniform Civil Code लागू करणारे पहिले राज्य ठरले उत्तराखंड; २७ जानेवारीपासून होणार अंमलबजावणी)

मध्य रेल्वेच्या संपूर्ण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना, महाव्यवस्थापक म्हणाले की, अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार-२०२४ मध्ये माननीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते एकूण कार्यक्षमतेसाठी प्रतिष्ठित गोविंद वल्लभ पंत शिल्ड आणि इतर ६ विभागीय शिल्ड प्राप्त करणे हा एक मोठा सन्मान आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार-२०२४ मधील ७ वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-२०२४ च्या २४ विभागीय शिल्ड विजेत्या विभागांचे आणि ९७ वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. (Republic Day)

मध्य रेल्वेच्या कामगिरीबद्दल बोलताना, धर्म वीर मीना (Dharam Veer Meena) यांनी अभिमानाने सांगितले की, मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेचा पहिला झोन आहे ज्याने दिव्यांगजनांसाठी डिजिटल ओळखपत्र सादर केले आहे, ज्यामुळे जलद आणि त्रासमुक्त ऑनलाइन आरक्षण शक्य झाले आहे. त्यांनी अभिमानाने सांगितले की भुसावळ विभागातील देवळाली स्थानकाला मध्य रेल्वेवरील पहिले पर्यावरणपूरक स्थानक होण्याचा मान मिळाला आहे जे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते. सानपाडा कार्यशाळेला ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी कडून “झिरो प्लस” लेबल देण्यात आले आहे. हा पुरस्कार भारताच्या नेट-झिरो कार्बन मिशनसाठी मध्य रेल्वेचे योगदान आणि वचनबद्धता दर्शिवते. (Republic Day)

(हेही वाचा – Republic Day 2025 : पहिल्या घटनादुरुस्तीची चित्तरकथा…नेहरूंनी Constitutionच्या मूळ ढाच्याची केली मोडतोड)

पायाभूत सुविधा विकास आणि महसूल यावर बोलताना धर्म वीर मीना (Dharam Veer Meena) म्हणाले, मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात उच्च महसूल वाढ साध्य केली आहे आणि नवीन मार्गिका, मल्टीट्रॅकिंग, नवीन गति शक्ती फ्रेट लोडिंग टर्मिनल, गुड्स शेड इत्यादी कार्यान्वित करून देशाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. त्यांनी वर्षभरात लिफ्ट, एस्केलेटर आणि एफओबी, आरओबी, आरयूबी सारख्या सुरक्षा उपायांबद्दल आणि लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढून टाकण्याबद्दल देखील सविस्तर माहिती दिली. (Republic Day)

ते म्हणाले की, मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पावले उचलली आहेत, ज्यामध्ये वंदे भारत, डेमू, मेमू, उपनगरीय गाड्या आणि इतर एलएचबी कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ते म्हणाले की, उपनगरीय गाड्यांमधील १४१ ईएमयू रॅकच्या महिला कोचमध्ये टॉक बॅक सिस्टम बसवण्यात आली आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते, ऑपरेशन अमानत, मेरी सहेली इत्यादी माध्यमातून उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ऑलिंपिकमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल खेळाडू स्वप्नील कुसळे आणि जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कामगिरी केल्याबद्दल मलकीत सिंग यांचे धर्म वीर मीना (Dharam Veer Meena) यांनी अभिनंदन केले. महाव्यवस्थापकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट सांघिक कार्याबद्दल अभिनंदन केले आणि रेल्वेला नवीन उंचीवर नेण्यासाठी सतत प्रगतीच्या मार्गावर काम करण्याचे आवाहन केले. यावेळी आरपीएफचा डॉग शो आणि सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमीच्या कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मध्य रेल्वेच्या यूट्यूब चॅनेलवर करण्यात आले. याप्रसंगी मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था (सीआरडब्लूडब्लूओ) च्या अध्यक्षा आशा मीना यांच्यासह इतर कार्यकारी सदस्य, अतिरिक्त महाव्यवस्थापक जगमोहन गर्ग, प्रधान विभाग प्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. धर्मवीर मीना, महाव्यवस्थापक आणि आशा मीना, अध्यक्षा, सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ यांनी भायखळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. येथे त्यांनी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट दिली, रुग्णांशी संवाद साधला आणि टॉवेल, फळे आणि भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. (Republic Day)

या प्रसंगी सीआरडब्लूडब्लूओ च्या अध्यक्षा आशा मीना यांनी रुग्णालयाच्या स्वयंपाकघरासाठी वेट ग्राइंडर आणि रुग्णालयातील पुरुष आणि महिला वॉर्डांना वजन/उंची मोजण्याचे तराजू देण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.