येत्या २६ जानेवारी रोजी देश ७६ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. लाल किल्ल्यावर (Red Fort), कर्तव्यपथावर भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहेत. कर्तव्यपथावर होणारी परेड नागरिकांसाठी प्रमुख आकर्षण असतं. ही परेड देशभक्ती, संस्कृती आणि एकतेच्या भावना निर्माण करते. त्यामुळे प्रत्यक्ष लालकिल्ल्यासमोर बसून ही परेड पाहणे हा अविस्मरणीय क्षण असतो. दरम्यान ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात १६ राज्य (State) आणि केंद्रशासित प्रदेश (Union Territories) तर १० केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ (Republic Day Chitrarath) कर्तव्य पथावर सादर केले जाणार आहेत. (Republic Day Parade 2025)
हे सर्व चित्ररथ (Republic Day Chitrarath) भारताच्या विविध शक्ती आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या, सतत विकसित होत असलेल्या सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवतील. सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गोवा, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, गुजरात, आंध्र प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, त्रिपुरा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, चंदिगड, दिल्ली, दादरा नगर हवेली आणि दिव-दमन यांचा समावेश आहे.
राज्ये/केंद्रशासित प्रदेश- चित्ररथांचे विषय
१. गोवा- गोव्याचा सांस्कृतिक वारसा
२. उत्तराखंड- उत्तराखंड: सांस्कृतिक वारसा आणि साहसी खेळ
३. हरियाणा- भगवद्गीतेचे सादरीकरण
४. झारखंड- सुवर्ण झारखंड: प्रगतीचा वारसा
५. गुजरात- सुवर्ण भारत: वारसा आणि विकास
६. आंध्र प्रदेश- एटीकोप्पाका बोम्मलू – पर्यावरणपूरक लाकडी खेळणी
७. पंजाब- ज्ञान आणि बुद्धीची भूमी पंजाब
८. उत्तर प्रदेश- महाकुंभ २०२५ – सुवर्ण भारत, वारसा आणि विकास
९. बिहार- सुवर्ण भारत: वारसा आणि विकास (नालंदा विद्यापीठ)
१०. मध्य प्रदेश- कुनो राष्ट्रीय उद्यान – बिबट्यांची भूमी
११. त्रिपुरा- शाश्वत श्रद्धा: त्रिपुरातील १४ देवांची पूजा – खर्ची पूजा
१२. तामिळनाडू- लक्कुंडी: दगडी कलाकृतींचा पाळणा
१३. पश्चिम बंगाल- ‘लक्ष्मी भंडार’ आणि ‘लोक प्रसार प्रकल्प’ – बंगालमध्ये जीवन सक्षम करणे आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे
१४. चंदीगड- चंदीगड: वारसा, नवोन्मेष आणि शाश्वततेचे सुसंवादी मिश्रण
१५. दिल्ली- दर्जेदार शिक्षण
१६. दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव- कुकरी स्मारकासह दमण पक्षीपालन उद्यान – भारतीय नौदलाच्या शूर खलाशांना श्रद्धांजली
मंत्रालये/विभाग- चित्ररथांचे विषय
१. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग- भारतीय संविधान हा आपल्या वारशाचा, विकासाचा पाया
२. आदिवासी व्यवहार मंत्रालय- आदिवासी गौरव वर्ष
३. महिला आणि बाल विकास मंत्रालय- मंत्रालयाच्या व्यापक योजनांअंतर्गत महिला आणि मुलांचा बहुआयामी प्रवास
४. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय- सुवर्ण भारत: वारसा आणि विकास
५. ग्रामीण विकास मंत्रालय- लखपती दीदी
६. वित्तीय सेवा विभाग- आर्थिक विकासातील भारताचा उल्लेखनीय प्रवास
७. पृथ्वी विज्ञान मंत्रालय- आधुनिक विज्ञान हवामानाचा अंदाज वर्तवत आहे – जीवन आणि उपजीविकेचे रक्षण
८. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग- सुवर्ण भारत वारसा आणि विकास- शाश्वत ग्रामीण विकासाचे प्रतीक म्हणून भारतातील स्थानिक गोवंशीय जातींचा सन्मान
९. संस्कृती मंत्रालय- सुवर्ण भारत: वारसा आणि विकास
१०. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग- फुलांद्वारे माध्यमातून भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षाचा उत्सव
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community