Republic Day : राजपथावर स्त्री शक्ती नेतृत्व करणार

महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, हे वारंवार सिद्ध झालंय. त्या देशाला सुरक्षित ठेवण्यात देखील मागे नाही, याची प्रचिती २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये देखील दिसून येणार आहे. कारण बहुतांश तुकड्यांचे नेतृत्व महिला कॅप्टन करणार आहेत.

227
Republic Day : राजपथावर स्त्री शक्ती नेतृत्व करणार
Republic Day : राजपथावर स्त्री शक्ती नेतृत्व करणार

महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, हे वारंवार सिद्ध झालंय. त्या देशाला सुरक्षित ठेवण्यात देखील मागे नाही, याची प्रचिती २६ जानेवारीला (Republic Day) राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये देखील दिसून येणार आहे. कारण बहुतांश तुकड्यांचे नेतृत्व महिला कॅप्टन करणार आहेत. दिल्लीच्या कर्तव्यपथावर यावर्षी होणारी प्रजासत्ताक दिनाची (Republic Day) परेड खूप वेगळी राहणार आहे. कारण, लष्करी, निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसातील महिला अधिकाऱ्यांच्या कसरती बघायला मिळणार आहेत. (Republic Day)

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी (Republic Day) दिल्लीतील कर्तव्यपथावर परेड होते. मात्र, या वर्षाची परेड आधीच्या परेडपेक्षा वेगळी राहणार आहे. मागील दोन आठवड्यापासून कर्तव्यपथावर फुल ड्रेस रिहर्सल सुरू आहे. आतापर्यंत सीआरपीएफ आणि तटरक्षक दलातील महिला जवानांचा समावेश परेडमध्ये केला जायचा. परंतु यावर्षी निमलष्करी दलातील महिला आणि दिल्ली पोलिसातील महिला जवानांचा समावेश करण्यात आला आहे. (Republic Day)

संरक्षण क्षेत्रातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दलाने आयोजित केलेल्या परेड तुकडीमध्ये पुरुष आणि महिला दोघेही सहभागी होतील. या तिघांच्या बँडमध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश असेल. परंतु दिल्ली पोलीस आणि सीआयएसएु, बीएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबी आदी निमलष्करी दलांच्या महिला जवानांना परेडमध्ये सामील करण्यात आले आहे. (Republic Day)

(हेही वाचा – Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचे जरांगे पाटलांना आवाहन; म्हणाले कायदेशीर लढा उभा करायचा असेल, तर…)

३७ चित्ररथांचा समावेश

सर्व बँडमध्ये फक्त महिला कर्मचारी राहणार आहेत. लहान तुकडीमध्ये सुमारे ९०-१०० महिला जवान असतील आणि निमलष्करी दलांसारख्या मोठ्या दलाच्या परेड तुकडीत सुमारे १३०-१५० महिला जवान राहतील. यावेळी फ्रेंच आर्मी आणि तिथले पोलिस एकत्र परेड करतील, ज्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही कर्मचारी उपस्थित असतील. कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये लष्करी तुकडी आपापल्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याबरोबरच अत्याधुनिक शस्त्रे, विविध राज्यांचे चित्ररथ, लढाऊ विमाने प्रदर्शन करणार आहेत. यंदा ३७ चित्ररथांचा समावेश करण्यात आला आहे. (Republic Day)

एअर फोर्सच्या विमानांचा करामाती म्हणजे देशवासीयांसाठी एकप्रकारची मेजवानीच असते. यंदाच्या परेडमध्ये एकूण ५१ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. यात २९ लढाऊ, आठ मालवाहू आणि १३ हेलिकॉप्टरचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, यातील काही विमाने महिला पायलट उडविणार आहेत. शिवाय, ४८ महिला अग्निवीर सुध्दा परेडमध्ये भाग घेणार आहेत. (Republic Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.