श्री तुळजाभवानी मंदिर (Shri Tuljabhavani Temple) संस्थानचा नव्याने लोगो तयार करण्यासह श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ञ/जाणकार/स्वारस्य असणाऱ्यांनी आकर्षक डिझाईनचे सादरीकरण श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कार्यालयात 23 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे. सादरीकरण करणाऱ्यांना तीन व एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
(हेही वाचा – ‘कुतीया’, ‘शिर्क’, ‘काफिर’; Sara Ali Khanने इंस्टाग्रामवर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यावर मुसलमानांकडून तिला होत आहे शिवीगाळ)
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या (Shri Tuljabhavani Temple) खालील बाबींसाठी तज्ञ असणाऱ्यांकडून खालील बाबींच्या अधीन राहून सादरीकरण मागवण्यात येत आहे. यामध्ये अ) श्री. तुळजाभवानी मंदिराचा लोगो डिझाईन करणेबाबत .1) लोगो हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा आहे हे सहजरित्या समजणे आवश्यक आहे. 2) लोगो आकर्षक असावा. 3) लोगोच्या रंगसंगतीमध्ये सुबकता असावी. 4) लोगो कमीत कमी जागेतही स्पष्ट व आकर्षक दिसावा. 5) लोगोत इतर कोणत्याही लोगोशी साधर्म्य व सुसंगत नसावा. 6) श्री तुळजाभवानी मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक, पारंपारीक रुढी, विधींचा अभ्यास करून लोगोचे आकर्षक असे डिझाईन सादर करावे. ब) श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत. 1) उपरोक्त बाबीसाठी टेक्नॉलॉजीबाबत प्रस्ताव सादर करावेत. अ व ब चे कामासाठी प्रोत्साहनपर बक्षिसे मंदिरमार्फत देण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – धर्मांध Muslim चांद ढाब्यावर भाकऱ्या बनवताना त्यावर थुंकायचा; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक)
सर्वोत्कृष्ट बक्षीस – इतर प्रोत्साहनपर बक्षीस दोन उपरोक्त सर्व बाबी तसेच इतर 3 लाख असणार आहे. 1 लाख प्रत्येकी असणार आहे. अनुषंगीक बाबी लक्षात घेऊन आपले आकर्षक डिझाईनचे सादरीकरण करावे तसेच श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत टेक्नॉलॉजीबाबत सविस्तरपणे प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी [email protected] इमेल आय.डी.वर किंवा ए.बी.चव्हाण 9403396131 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. (Shri Tuljabhavani Temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community