Telangana Tunnel Collapse : बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेची शक्यता धुसर; बचावकार्यात अनेक अडथळे

42

तेलंगणातील श्रीशैलम (Srisailam) डावा किनारा कालवा (एसएलबीसी, Srisailam Left Bank Canal) प्रकल्पाच्या खचलेल्या बोगद्यात ८ मजूर अडकले आहेत. (Telangana Tunnel Collapse) त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. मात्र येथे पाणी आणि चिखल मोठ्या प्रमाणात असल्याने अजूनही पीडितांपर्यंत पोहोचता आलेले नाही. अडकलेल्या आठ मजुरांच्या सुटकेची आशा धूसर झाली आहे.

(हेही वाचा – रक्ताच्या नात्यातील व्यक्तींची जात वेगवेगळी कशी ?; Mumbai High Court म्हणाले…)

बचाव पथकाचे कार्य सुरू असतानाच पाणी आणि चिखल गळतीमुळे प्रचंड पेच निर्माण झाला आहे. बोगदा खचल्यानंतर शनिवार, २२ फेब्रुवारीपासून आठ मजूर येथे अडकलेले आहेत. चिखल साचल्यामुळे पीडितांपर्यंत पोहोचण्यासाठी तूर्तास कोणतेही तंत्रज्ञान नसल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बोगद्यात मातीची भिंत ओलांडून पीडितांपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकेल, असे कोणतेही तंत्रज्ञान नाही. तसेच अद्याप अडकलेल्या लोकांशी संपर्कही होऊ शकलेला नाही, अशी माहिती समोर येत आहे. येथे ५८४ कुशल कर्मचाऱ्यांच्या पथकाने निरीक्षणही केले होते, परंतु यश आले नाही.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नौदल, लष्कर आणि इतर संघटनांसोबत बैठक पार पडली. घटनास्थळी उपस्थित कोणताही तज्ज्ञ चिखलाची भिंत ओलांडून अडकलेल्या लोकांपर्यंत कसे पोहोचायचे हे सुचवू शकले नाही. शनिवारी सकाळी बोगद्याच्या १३.५ किलोमीटर आत छताचा एक भाग कोसळून सुमारे ६० तास उलटले आहेत. चिखलात तीक्ष्ण धातू, काँक्रीटचे तुकडे अन्य सामग्री आहे. त्यामुळे बचाव पथकही जखमी होण्याची शक्यता आहे.

(Telangana Tunnel Collapse)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.