किनारपट्टीवरील खडकाळ भागांत जैवविविधतेचे नंदनवन, तज्ज्ञांच्या अभ्यासातील निष्कर्ष

135

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रावरील खडकाळ प्रदेशातील जैवविविधतेचा अखेर उलगडा झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत खडकाळ भागांत तब्बल ३०३ समुद्री प्राण्यांच्या प्रजाती आढळून आल्याचे संशोधनातून समोर आले. सर्वात जास्त समुद्री जीवांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिना-यावरील खळकाळ भागांत दिसली. हे संशोधन सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी एण्ड नॅचरल हिस्ट्री (सॅकॉन) या पर्यावरणप्रेमी संस्थेने केले आहे. या समुद्री जैवविविधतेबाबत जनजागृती व्हावी म्हणून दोन्ही जिल्ह्यातील ८ निवडक ठिकाणी निसर्ग पर्यटन सुरु केले जाणार असल्याचे कांदळवन कक्षाने जाहीर केले.

( हेही वाचा : मुंबईत 1 ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी अच्छे दिन )

किनारपट्टीवरील किनारीप्रदेशाला लागून खडकाळ परिसर आढळतो. भरतीच्यावेळी खडकाळ भाग पाण्याखाली जातो. समुद्रातील जैवविविधतेवर काम करणा-या अभ्यासकांच्या माहितीनुसार, मुंबईतील हाजी अली परिसरातील खळकाळ भाग साधारणतः १० फूटापर्यंत खोल आहे. दक्षिण कोकणातील खळकाळ भागांची खोली मात्र दुप्पटीने जास्त आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील किना-यावरील समृद्ध जैवविविधतेबाबत सागरी अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. समाजमाध्यमांवर जनजागृती झाल्याने मुंबईतील सागरी जैवविवधतेबाबत आता ब-यापैकी जनजागृती झाली आहे. परंतु दक्षिण कोकणातील समुद्रकिना-यालगतालच्या खडकाळ भागांत राहणा-या समुद्री जीवांबाबत फारशी माहिती नव्हती. सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी एण्ड नॅचरल हिस्ट्री (सॅकॉन) संस्थेच्या शास्त्रज्ञांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ४५ खडकाळ भागांचे सर्व्हेक्षण केले. या अभ्यासासाठी ५०० मीटरच्या सलग खडकाळ किना-याच्या २५ ठिकाणांची निवड केली. खडकाळ भागांत साचलेल्या पाण्यात जैवविविधेत पावसाळा आणि त्यानंतर काय फरक दिसून येतो, याबाबतचे निरीक्षण नोंदवले गेले. पावसाळ्याअगोदरही जैवविविधतेत बदल दिसतो का, याबाबतचीही माहिती घेतली गेली. या अभ्यासात गोल्डिन क्वाड्रोस, शिरीष मांची, सिद्धेश भावे यांनी सहभाग घेतला होता. या संशोधनासाठी मॅनग्रोव्ह एण्ड मरिन बायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने आर्थिक साहाय्य पुरवले.

शास्त्रज्ञांचे निरीक्षण –

संशोधनानंतर सिंधुदुर्गातील कुणकेश्वर येथे सर्वाधिक समुद्री जीवांच्या प्रजातींची नोंद झाली. गिर्येघारी येथे फारसे समुद्री जीवांच्या प्रजातींचे दर्शन झाले नाही. रत्नागिरी जिल्ह्यात कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या वेळास येथील खडकाळ भाग समुद्री जीवांच्या जैवविविधतेने नटलेला असल्याचाही नवा उलगडा या अभ्यासातून झाला. रत्नागिरीत गावखाडीत समुद्री जीवांची संख्या कमी असल्याची नोंद झाली.

New Project 4 15

कोणत्या समुद्री प्रजाती आढळल्या

समुद्री शैवाळ आणि अल्गेच्या ३० प्रजाती, वनस्पती प्लवकांच्या ८०, प्राणी प्लवकाच्या ७३, तसेच सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, मासे तसेच खडकाळ भागांजवळ दिसून येणारे पक्षी, अपृष्ठवंशीय प्राणी असे मिळून ८० प्रजातींची नोंद झाली. किनारपट्टीवरील २८८ किमी परिसरात ३० पक्ष्यांच्या प्रजाती शास्त्रज्ञांना आढळल्या.

दक्षिण कोकणातील या भागात सुरु होणार निसर्ग पर्यटनाच्या संधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तांबळडेग, कुणकेश्वर आणि भोगवे तर रत्नागिरीत काटघर, हेदवी, खारवीपाडा, वेळास आणि वेळणेश्वर येथील खडकाळ भागात बहरलेली जैवविविधता दाखवण्यासाठी निसर्ग पर्यटनाच्या संधी आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.