महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा (Reservation) वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यात माजी मंत्री व यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे यांचा समावेश आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आता धनगर समाजाने आंदोलन सुरू केल्याने राज्य सरकार समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच उपोषणा बसलेल्यांनी तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
काय म्हणाले रोहित पवार
या संदर्भात आमदार रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी हे माझ्या मतदारसंघातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी धनगर आरक्षण आणि मेंढपाळांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सोडवण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांनी I.N.D.I.A हे लोकांच्या हिताचं जे संघटन आहे त्यांनी देखील केंद्र सरकारकडे याबाबतची मागणी करावी अशी विनंती केली.
हेही पहा –