रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचे प्रतिपादन

41
रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

भारत २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी केले. आरबीआयच्या ९०व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील एनसीपीए येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा उपस्थित होते.

(हेही वाचा – सनातन हिंदू धर्माबद्दल Mamata Banerjee यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, ‘एक घाणेरडा धर्म…’)

राष्ट्रपती (Droupadi Murmu) म्हणाल्या की, १९३५ मध्ये स्थापन झालेल्या आरबीआयने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या जागतिक महासत्तेपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल व्यवहारांत भारताला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात युपीआयसारख्या नाविन्यपूर्ण प्रणालींद्वारे आरबीआयचा मोठा वाटा आहे. वित्तीय समावेशन, ग्राहक संरक्षण आणि सायबर सुरक्षेसाठीही आरबीआय सक्रिय आहे. जनधन योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले असून, ‘ग्रीन डिपॉझिट फ्रेमवर्क’द्वारे हरित अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.

(हेही वाचा – युट्यूबर Ranveer Allahabadia याला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)

आरबीआयने नाबार्ड, सिडबीसारख्या संस्था स्थापन करून शेती आणि लघु व्यवसायांना पाठबळ दिले. ‘लीड बँक योजना’मुळे ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचल्या. ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य देत तक्रार निवारणासाठी ‘एकात्मिक लोकपाल योजना’ सुरू केली. गेल्या ९० वर्षांत महागाई नियंत्रण, आर्थिक सुधारणा आणि कोविड-१९ संकटातही आरबीआयने प्रभावी उपाययोजना केल्या. जनतेचा विश्वास हीच त्याची मोठी संपत्ती असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी आरबीआयचे कौतुक केले. यावेळी विशेष स्टॅम्पचे अनावरणही झाले. (Droupadi Murmu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.