-
ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेकडून १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्यामुळे आताच्या नोटा बाद होणार असल्याची एक बातमी सगळीकडे पसरली आहे. पण, यात कसलंही तथ्य नसल्याचं मध्यवर्ती बँकेनं पत्रक काढून स्पष्ट केलं आहे. बँक १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा छापण्यात येणार आहेत. पण, त्यामुळे जुन्या नोटा बाद होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Reserve Bank News)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी अलीकडेच सूत्र हातात घेतली आहेत. त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा नोटांची छपाई होणार आहे. १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा लवकरच जारी केल्या जाणार आहेत. मात्र, याच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आधीच्या मालिकेतील या नोटा असतील. फक्त त्यावर गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांच्या ऐवजी आता संजय मल्होत्रा यांची सही असेल. (Reserve Bank News)
(हेही वाचा – रेडी रेकनरची दरवाढ सरसकट नसेल; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांची विधान परिषदेत माहिती)
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार नव्या नोटांप्रमाणं जुन्या नोटा देखील वैध असतील. म्हणजेच त्यामध्ये व्यवहार सुरू ठेवता येईल. फक्त बाजारात नोटांची उपलब्धता कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ साली मध्यवर्ती बँकेने २००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर मोठ्या मूल्याच्या नोटा न काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा काढण्यात येणार आहेत. (Reserve Bank News)
आरबीआयने २००० हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतरही बाजारातील रोकड वाढली आहे. मध्यवरती बँकेच्याच आकडेवारीनुसार मार्च २०१७ मध्ये बाजारात १३.३५ लाख कोटींची रोकड होती. तर, मार्च २०२४ पर्यंत याची वाढ ३५.१५ लाख कोटी झाली आहे. मार्च २०२० पर्यंत यूपीआय व्यवहारांची संख्या २.०६ लाख कोटी होती. जी फेब्रुवारी २०२४ पर्यंत १८.०७ लाख कोटी झाली. २०२४ चा विचार केला तर वर्षभरात डिजीटल व्यवहारांची संख्या १७२ अब्ज इतकी होती. (Reserve Bank News)
(हेही वाचा – MSRTC च्या बस चालकाने प्रभादेवी ब्रिजवर तिघांना चिरडले; एकाचा मृत्यू)
दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक रक्कम एटीएममधून काढली गेली. तर, सण आणि निवडणुकीच्या काळात रोख रकमेची मागणी वाढल्याचं दिसून आलं. ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटची सेवा मर्यादित आहे. यामुळे लोक रोख रकमेचा वापर व्यवहारासाठी करतात. दरम्यान शक्तिकांत दास यांच्या जागी गव्हर्नर म्हणून निवड झाल्यानंतर संजय मल्होत्रा यांनी पहिल्याच तिमाहीत रेपो रेट घटवला होता. शक्तिकांत दास यांची त्यानंतर पीएमओमध्ये नियुक्त करण्यात आली. (Reserve Bank News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community