‘ही’ नाणी लवकरच होणार बंद; नुकसान होण्याआधीच बँकेत करा जमा

104

मोदी सरकारने 2016 मध्ये 1 हजार आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यावेळी असंख्य लोकांची गैरसोय झाली होती. कित्येकांचे पैसे कागदाच्या तुकडे बनून राहिले होते. आता अशीच परिस्थिती पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडेही 1 रुपया 50 पैशांची नाणी असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला 1 रुपया आणि 50 पैशांची नाणी बॅंकेत जमा करायची असतील तर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय सहजपणे बॅंकेत जमा करु शकता. पण एकदा जुनी नाणी जमा केल्यानंतर बॅंका ती नाणी परत देणार नाहीत, त्याऐवजी तुम्हाला नवीन नाणी किंवा नोटा दिल्या जातील.

1 रुपया आणि 50 पैशांची कप्रोनिकेल ( तांबे- निकेल) नाणी चलनात नसल्याचे वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. परंतु याबाबत अद्याप रिझर्व्ह बॅंकेकडून कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही.

ICICI बॅंकेच्या शाखेत नाण्यांबाबत सूचना

नवी दिल्ली परिसरात असलेल्या ICICI बॅंकेच्या शाखेने लावलेल्या नोटीसनुसार, काही नाणी पुन्हा जारी करण्याची परवानगी नाही. याचा अर्थ असा की एकदा बॅंकेत जमा केल्यानंतर ते बॅंकेकडून पुन्हा जारी केले जाणार नाहीत. ही नाणी केंद्रीय बॅंकेद्वारे संबंधित बॅंकांकडून परत घेतली जातील.

( हेही वाचा: RBI ने ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई; तुमचं खात तर नाही ना? )

ही नाणी बेकायदेशीर नाहीत

वास्तविक, याचा अर्थ एवढाच की अशी नाणी कायदेशीर निविदा असणार नाहीत. ही नाणी कायदेशीर निविदा आहेत. मात्र, ती चलनातून बाहेर काढली जात आहेत. वास्तविक ही नाणी जुनी आहेत आणि 1990 च्या दशकात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस सामान्यत: वापरली जात होती. बॅंकेने जारी केलेल्या नोटीसनुसार, आरबीआयच्या निर्देशांनुसार पुढील नाणी पुन्हा जारी केली जाणार नाहीत.

  • Cupronickel Coins of Re 1
  • Cupronickel Coins of 50 paise
  • Cupronickel Coins of 25 paise
  • Stainless Steel Coins of 10 paise
  • Aluminium bronze coins of 10 paise
  • Aluminium Coins of 20 paise
  • Aluminium Coins of 10 paise
  • Aluminium Coins of 5 paise
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.