रिझर्व्ह बॅंकेने ‘या’ बॅंकांना ठोठावला दंड; ‘हे’ आहे कारण

157

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणत्या बॅंका आहेत, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने तीन बॅंकांवर नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे.

महाराष्ट्रातील या तीन बॅंकांवर कारवाई

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. इंदापूर अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंक, द यवतमाळ को ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, वरुड को- ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड या तीन बॅंकांवर दंडात्मक कारवाई आहे.

( हेही वाचा: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; भाजप आणि शिंदे गटातील हे मंत्री शपथ घेण्याची शक्यता )

…म्हणून ठोठावला दंड

RBI ने अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकांसाठी आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने, इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर केवायसीप्रकरणी अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यवतमाळ अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंकेला 3.50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच वरुड अर्बन को-ऑहरेटीव्ह बॅंकेला आरबीआयने सहकारी बॅंकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि केवायलीपॅकरणी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.