
-
प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५ इमारतींसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सकारात्मक तोडगा काढला जाईल आणि या इमारतींतील एकाही रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी घेतली आहे.
या महत्त्वाच्या प्रश्नावर बुधवारी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त तसेच ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
(हेही वाचा – माँ जिजाऊंच्या पाचाड येथील समाधीस्थळाचा दर्जेदार विकास करावा; भाजपा गटनेते Pravin Darekar यांची मागणी)
या बैठकीत रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी स्पष्ट सांगितले की, या ६५ इमारतीमधील रहिवाशांची घरे ही त्यांची हक्काची घरे आहेत. कुणी कर्ज काढून तर कुणी आयुष्याची पुंजी खर्च करून ही घरे घेतली आहेत. त्यामुळे या हजारो रहिवाश्यांच्या डोक्यावरचे छप्पर कायम राहिले पाहिजे. उल्हासनगरमध्ये यासारख्याच प्रकरणावर सरकारने सकारात्मक तोडगा काढला होता, त्याच धर्तीवर या प्रकरणावरही निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रश्नाच्या गांभीर्याची दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चारही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक येत्या चार दिवसांत घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी संबंधित विभागांनी सविस्तर अहवाल सादर करून प्रस्ताव तयार करावा आणि तो मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे हजारो रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Ravindra Chavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community