आता २१ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक ध्यान दिवस (World Meditation Day) साजरा केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने (United Nations General Assembly) यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर केला. भारतासह इतर देशांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. भारताबरोबरच, लिकटेंस्टीन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा हे देशांच्या कोर गटाचा भाग होते ज्यांनी शुक्रवारी १९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेत ‘जागतिक ध्यान दिन’ नावाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (World Meditation Day)
(हेही वाचा – No Parking मध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि ‘टोईंग’चा भुर्दंडही भरावा लागणार)
२१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस (December 21 is World Meditation Day) म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. वसुधैव कुटुंबकम (Vasudhaiva Kutumbakam) (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे. माणसाच्या कल्याणासाठी सर्व जगाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे, असे भारताला वाटते. जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग (21 June International Yoga) दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी २०१४ साली भारताने पुढाकार घेतला होता. त्याची आठवण करून देत पर्वतनेनी हरीश यांनी म्हटले आहे की, जागतिक योग (Yoga) दिन ही गेल्या दहा वर्षांत जागतिक चळवळ बनली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक योगासनांचे धडे घेत आहे. तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community