धर्मावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही; Raj Thackeray, Jitendra Awhad यांच्याविरोधात संत समितीच्या बैठकीत ठराव

70

धर्माविषयी अधिकार नसताना वक्तव्य करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादीचे (शरद पवार) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना प्रतिबंधित करण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी नाशिक (Nashik) येथील संतसमितीच्या बैठकीत करण्यात आला.

(हेही वाचा – Love Jihad : आसिफ कुरेशीने ओळख लपवून केला पीडितेवर अत्याचार; आशिष असल्याचा केला बनाव)

शनिवार, ६ एप्रिल या दिवशी पंचवटीतील जनार्दन स्वामी मठात संत समितीची बैठक दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदासशास्त्री महाराज, महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती, संत समितीचे प्रदेश प्रमुख महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, महंत सुधीरदास पुजारी, आखाडा परिषदेचे भक्तीचरण दास महाराज आदींच्या उपस्थितीत झाली. या वेळी ही मागणी करण्यात आली. यासह संपूर्ण देशात गोहत्या बंदी कायदा लागू करावा, यांसह इतर मागण्यांचे ठराव अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत करण्यात आले.

धर्मावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. राजकीय नेत्यांच्या विधानांमुळे संभ्रम निर्माण होतो. भावना दुखावल्या जातात. जितेंद्र आव्हाड आणि राज ठाकरे यांचे दाखले देत अशी विधाने करणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आल्याचे महंत अनिकेतशास्त्री यांनी सांगितले.

दरम्यान, आगामी कुंभमेळ्याआधी (nashik kumbh mela 2027) गोदावरी (Godavari) आणि तिच्या उपनद्यांचे शुध्दीकरण होणे आवश्यक आहे. कुंभमेळा नियोजनात, प्राधिकरणात धर्माचार्य आणि तीर्थ पुरोहितांना स्थान देण्याचा मुद्दा मांडला गेला. देशातील ८० टक्के नागरिकांची गोहत्या बंदी व्हावी, अशी इच्छा असल्याने केंद्र सरकारने देशात गोहत्या बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी करणारा ठराव करण्यात आला. त्र्यंबकेश्वरप्रमाणे (Trimbakeshwar) नाशिकलाही ‘अ’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी महंत सुधीरदास यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.