सध्या म्हाडाच्या (Mhada) घरांच्या लॉटरीला येणार प्रतिसाद घटत चालला आहे. त्याचा परिणाम म्हणूनच कि काय सध्या म्हाडाची ११ हजाराहून अधिक तयार घरे आणि भूखंड पडून आहेत. त्यामुळे आता म्हाडा या घरांची विक्री खासगी संस्थांच्या माध्यमातून करणार आहे.
खासगी संस्थांना ५ टक्के मोबदला
म्हाडाच्या (Mhada) या सगळ्या संपत्तीची किंमत सुमारे तीन हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार म्हाडाचे संबंधित मंडळ निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम, विपणन क्षेत्रांतील संस्थेची नियुक्ती करणार आहे. संस्थेला प्रत्येक सदनिका आणि भूखंडाच्या विक्री किमतीच्या ५ टक्के रक्कम मोबदला म्हणून दिला जाणार आहे. भूखंडांसाठी वारंवार सोडत काढण्यात आली. तसेच ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट करण्यात आली. तरीही त्यांची विक्री होऊ शकली नाही. विरार-बोळींजची सर्वाधिक घरे पडून आहेत.
किती मालमत्ता विकायची आहे?
११,१८४ घरे, ७४८ भूखंड घरांच्या विक्रीसाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर म्हाडाने (Mhada) एक समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार ११ हजार १८४ घरे, ७४८ भूखंड आणि २९८ अनिवासी गाळ्यांची विक्री होत नसल्याने निदर्शनास आले.
Join Our WhatsApp Community