लोकमान्य टिळक टर्मिनसवर लवकरच रेस्टॉरंट ऑन व्हील्स

प्रवासी पर्यटकांना रेल्वेच्या डब्यांमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून जानेवारी २०२३ मध्ये हे रेस्टॉरंट सेवेत येईल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ट्रेन उशिराने धावत असल्यास प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर वाट पहावी लागते अशावेळी रेस्टॉरंट ऑन व्हील्स या सुविधेअंतर्गत प्रवासी आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

( हेही वाचा : कोकण रेल्वेची ‘तेजस एक्स्प्रेस’ १५ सप्टेंबरपासून विस्टाडोम कोचसह मडगावपर्यंत धावणार)

रेस्टॉरंट ऑन व्हील्स

रेस्टॉरंट ऑन व्हील्स ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी रेल्वेच्या जुन्या व वापरात नसलेल्या डब्यांचे रुपांतर या उपहारगृहांमध्ये करण्यात येते. ही संकल्पना ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएसएमटी स्थानकाच्या हद्दीत अंमलात आणली. या स्थानकावरील फलाट क्रमांक १८च्या बाहेरील आवारातच उपाहारगृह उभे करण्यात आले. हा डबा वातानुकूलित असून यात ४० जणांना बसण्याची व्यवस्था आहे.

एलटीटी स्थानकावर सुविधा 

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील एलटीटी, कल्याण आणि नेरळ स्थानकातही ही संकल्पना प्रवाशांसाठी अंमलात आणली जाणार आहे. आत एलटीटी स्थानक परिसरात सुद्धा रेस्टॉरंट ऑन व्हील्स उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याला आता गती दिली जात आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. जानेवारी २०२३ मध्ये एलटीटीवरील प्रवाशांना या रेस्टॉरंट ऑन व्हील्समधील जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here