पुण्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध! कसे आहेत नियम?

सोमवार 28 जून पासून पुन्हा निर्बंध वाढवण्यात आले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट काहीशी आटोक्‍यात येत असताना, आता डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा धोका सरकारने वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यासाठी नवीन प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केली आहे. पुणे शहरात सध्या रुग्ण संख्या नियंत्रणात असली तरी वाढती गर्दी, बदलते हवामान आणि नवीन विषाणूच्या प्रकारचा धोका लक्षात घेऊन, पुण्यात नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

शहरातील कोरोना संसर्ग कमी होत असताना टप्याटप्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. या आठवड्यातही निर्बंध अजून शिथिल होतील, अशी अपेक्षा पुणेकरांना होती. पण शहरातील पुन्हा वाढलेला कोरोनाबाधित रुग्णांचा दर लक्षात घेता, सोमवार 28 जून पासून पुन्हा निर्बंध वाढवण्यात आले आहेत.

(हेही वाचाः महाराष्ट्रावर डेल्टा प्लस कोरोनाचे संकट! ‘या’ जिल्ह्यांत सापडले रुग्ण!)

असे आहेत नियम

 • उद्याने आणि मैदाने केवळ सकाळी 5 ते 9 या वेळेतच सुरू राहणार.
 • खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
 • मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, संपूर्णत: बंद.
 • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
 • पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील.
 • लोकल ट्रेन फक्त वैद्यकीय, अत्यावश्‍यक आणि शासकीय सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी.
 • सर्व प्रकारचे कार्यक्रम केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत, तर सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद.
 • अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी.
 • शेतीसंबंधित दुकाने, शेतमालाची विक्री दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार.
 • सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी, त्यानंतर संचारबंदी.
 • पीएमपीएमएल बसेस 50 टक्के क्षमतेने धावणार.
 • मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here