गणेशोत्सव मंडळांनो, ‘या’ पुलांवर मिरवणुका नेऊ नका! 

पुलांवर थांबून राहू नये, पुलांवर ध्वनिक्षेपकांचा वापर करू नये, असे महापालिकेने म्हटले आहे.

127

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरातील रेल्वे उड्डाणपुलांवर मिरवणुकीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. या पुलांवरून जाताना अतिभार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केली आहे.

काय म्हटले आहे महापालिकेने? 

उत्सव काळात सार्वजनिक पुलांवरून ये-जा करण्यासाठी नियम बनवण्यात आले आहेत. रेल्वेमार्गांवरील काही पूल हे अतिशय जुने झाले असल्याने धोकादायक झाले आहेत. काही पुलांची दुरुस्ती कामे सुरू आहेत. काही पुलांवर अवजड वाहनांना प्रतिबंध आहे, तर काहींवर वाहतुकीस प्रतिबंध आहे. या सर्व बाबी लक्षात घेता सर्व गणेशभक्तांनी या पुलांचा गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जनासाठी उपयोग करताना विविध बाबींची काळजी घ्यावी, असे पोलिस व पालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुकांना बंदी असल्याने आगमन/विसर्जनाच्या वेळेस पुलांवर गर्दी करू नये. तसेच पुलांवर थांबून राहू नये, पुलांवर ध्वनिक्षेपकांचा वापर करू नये, असे महापालिकेने म्हटले आहे.

(हेही वाचा : माहिममधील जलवाहिनी लगतची ८० ते १०० कुटुंबे आजही उपेक्षितच)

‘या’ पुलांवर निर्बंध

मध्‍य रेल्‍वे

घाटकोपर उड्डाणपूल, करीरोड उड्डाणपूल, चिंचपोकळी उड्डाणपूल, भायखळा उड्डाणपूल

पश्चिम रेल्वे

मरिन लाइन्‍स उड्डाणपूल, सँडहर्स्‍ट रोड रेल्वे उड्डाणपूल, फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल, केनडी रेल्वे उड्डाण पूल, फॉकलॅण्ड रेल्वे उड्डाणपूल, महालक्ष्‍मी स्‍टील रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी कॅरोल रेल्वे उड्डाणपूल, दादर टिळक रेल्वे उड्डाणपूल, अंधेरी गोखले रेल्वे उड्डाणपूल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.