राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता सर्वच जिल्ह्यांतील प्रशासन यंत्रणा सतर्क झाल्या असून कडक निर्बंध घालायला सुरुवात केली आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच आता मुंबईनंतर पुण्यातही होळी आणि धुलिवंदन साजरे करण्यावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
असे आहेत निर्बंध
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होळी आणि धुलीवंदन उत्सवात कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून, पुणे महानगर पालिकेतर्फे होळी व धुळवड साजरी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक तसेच खाजगी मोकळ्या जागा व सोसायट्यांमधील मोकळ्या जागी रंगपंचमी व होळी साजरी करण्यास मनाई केली आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जाहीर केले आहेत.
(हेही वाचाः बुरा न मानो, कोरोना है!)
अन्यथा कारवाई केली जाणार
२८ मार्च २०२१ला साजरी होणारी होळी आणि २९ मार्चला साजरा होणारा धुलीवंदन आणि रंगपंचमी सण/उत्सव साजरे करण्यास मनाई केली आहे. सदर मनाई आदेशांचं पालन करुन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे महापालिकेतर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच या आदेशांचा भंग करणा-या नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community