‘थर्टी फस्ट’ची मजा कोकणात घेणार आहात, तर हे वाचाच…

106

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेरगावी जातात. यंदा आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असल्यामुळे पर्यटकांनी स्वदेशी पर्यटनाचा मार्ग निवडला, परंतु ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात विशेष नियमावली लागू करण्यात आल्यामुळे पर्यटनावर बंधने येणार आहेत. बहुतांश लोक दरवर्षी सुट्टीच्या दिवसात कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा पर्याय निवडतात. पण यंदा कोरोना पार्श्वभूमीवर कोकणातसुद्धा ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात निर्बंध

पर्यटनाला होणाऱ्या गर्दीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलम 37(3) नुसार पाच किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे, यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. पोलिस अधिक्षकांची अथवा अधिकृत परवानगी धारकांनाच हा नियम लागू होणार नाही. तसेच या नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्ह्याधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

( हेही वाचा : ईडीच्या कारवायांवर अखेर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले! म्हणाले… )

पर्यटकांनो, सावधान!

राज्य सरकारमार्फत लवकरच ३१ डिसेंबरसाठी विशेष नियमावली जारी करण्यात येणार आहे. यामुळेच लोकांना पर्यटनासाठी बाहेर पडताना योग्य नियमावली, निर्बंध यांची खातरजमा करूनच बाहेर पडावे लागणार आहे. ओमायक्रॉनचे संकट पाहता मुंबईत पुढील १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थर्टी फर्स्ट साजरा करता येणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.