SDMA : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना; मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्यांची नियुक्ती

31
SDMA : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना; मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्यांची नियुक्ती
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (SDMA) पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचा समावेश सदस्य म्हणून करण्यात आलेला आहे.

(हेही वाचा – जय भीम म्हणणे काँग्रेसची मजबुरी; PM Narendra Modi यांचा गंभीर आरोप)

गुरुवारी शासनाने या पुनर्रचनेचा आदेश जारी केला. त्यानुसार, प्राधिकरणाचे (SDMA) सदस्य म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, मुंबई आयआयटीचे प्रा. रवि सिन्हा आणि प्रा. दिपंकर चौधरी यांना अशासकीय सदस्य म्हणून प्राधिकरणात स्थान देण्यात आले आहे.

(हेही वाचा – राज्य सरकारने Ladki Bahin Yojana सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी केली ‘ही’ तयारी)

शासन निर्णयानुसार, राज्याचे मुख्य सचिव हे प्राधिकरणाचे (SDMA) पदसिद्ध सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात तज्ज्ञांचा समावेश होईल आणि प्रभावी निर्णय प्रक्रिया सुनिश्चित होईल. आशा व्यक्त केली जात आहे की, या नव्या रचनेमुळे राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाची कार्यक्षमता सुधारेल आणि भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींवर त्वरित व प्रभावीपणे प्रतिसाद दिला जाईल. या निर्णयामुळे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात चांगले समन्वय साधता येईल आणि नागरिकांना योग्य मदत पुरवली जाईल. राज्य सरकारचे प्रयत्न आपत्ती निवारण आणि पुनर्वसन प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.