Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; पुन्हा जाळली पोलीस चौकी

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्यानंतर, जिरीबामपासून 30 किमी दूर असलेल्या खेड्यांमध्ये मदत शिबिरात रहाणाऱ्या 200 हून अधिक लोकांना जिरीबाममधील मदत शिबिरात आणण्यात आले आहे.

184
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; पुन्हा जाळली पोलीस चौकी
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; पुन्हा जाळली पोलीस चौकी

मणिपूर पोलिसांनी शनिवार, ८ जून रोजी सांगितले की, जिरिबाम जिल्ह्यातील लामताई खुनौ, बेगरा, नूनखल, दिबोंग खुनौ इत्यादी बाहेरील गावांमध्ये राहणाऱ्या लोकांची घरे काल गावकऱ्यांनी जाळली. या छावण्यांच्या सुरक्षेसाठी मणिपूर पोलिसांनी कमांडो पोलीस तैनात केले आहेत. राज्यात गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी सोइबाम शरत कुमार सिंग नामक व्यक्तीची हत्या केल्यानंतर जिरीबाममध्ये हिंसाचार (Manipur Violence) उसळला होता.

(हेही वाचा – Bhandara : पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; तरुणीकडे केली शरीरसुखाची मागणी)

लोक निर्वासित छावण्यांमध्ये विस्थापित

बोटीतून आलेल्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. जिरी या पोलीस चौकीला दुपारी आग लावण्यात आली, तर जिरीबाम जिल्ह्याच्या बाहेरील भागात अनेक घरे जाळली आहेत. काही ठिकाणी अंधाराचा फायदा घेत हल्ले करण्यात आले आहेत. तेथे आजूबाजूच्या गावातील रिकामी घरे जाळली. मात्र या घरांमध्ये रहाणारे लोक आधीच निर्वासित छावण्यांमध्ये विस्थापित झाले होते. जिरीबाम हे मणिपूरमधील एक ठिकाण आहे जिथे नागा, कुकी, गैर-मणिपुरी, मणिपुरी, मैतेई आणि मुस्लिम इत्यादी सर्व समुदायांचे लोक रहातात.

शस्त्रे परत करण्यासाठी स्थानिकांचा विरोध

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या हिंसाचाराचा प्रभाव जिरीबाममध्ये (Jiribam) दिसला नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये स्वसंरक्षणासाठी परवानाधारक शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांनी शस्त्रे परत करण्यासाठी विरोध सुरू केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जमा केलेली शस्त्रे परत करण्यास विलंब होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास व मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – Modi Cabinet : श्रीकांत शिंदे मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद; शिवसेनेतून कोण होणार मंत्री?)

अतिरेक्यांनी शुक्रवारी रात्री येथील जिरीबाम जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर आणि काही घरांवर हल्ला केला. त्यानंतर पोलीस चौकी आणि काही घरांना आग लावली. या घटनेनंतर जिरीबाम जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट झालं असून या परिसरातील तब्बल २०० पेक्षा जास्त लोकांना मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

राजधानी इंफाळपासून तब्बल २२० किमी अंतरावर असलेल्या लामता खुनो, मोधूपूर भागातही हल्ले झाले आहेत. यानंतर मणिपूर (Manipur Violence) पोलिसांच्या कमांडो तुकडीला शनिवारी सकाळी इम्फाळहून जिरीबाम येथे विमानाने पाठवण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.