- ऋजुता लुकतुके
याच महिन्यात पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी किरकोळ महागाई दर ५ टक्क्यांपेक्षा खाली आणण्याचं उद्दिष्टं वारंवार बोलून दाखवलं होतं. आता निदान मार्च महिन्यासाठी तरी यात यश आलं आहे. आणि मार्च महिन्याचा महागाई दर ४.८५ टक्के असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा मागच्या १० महिन्यातील निच्चांक आहे. मे २०२३ नंतर हा सगळ्यात कमी महागाई दर आहे. (Retail Inflation Rate)
(हेही वाचा- Ather Rizta : एथर एनर्जीची नवीन फॅमिली ई-स्कूटर)
महागाई (inflation) दरात थोडी घसरण झाली असली तरी रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) कर्जावरील व्याजदर जैसे थे ठेवण्याचाच निर्णय दोन आठवड्यांपूर्वी घेतला होता. त्यामुळे सरकारची भूमिका सावध असल्याचंच दिसतंय. कारण, ग्राहकोपयोगी वस्तूंचा महागाई दर या आर्थिक वर्षासाठी ४.५ टक्के इतका असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँक देशाचा महागाई दर २ ते ६ टक्क्यांच्या मध्ये असेल यासाठी प्रयत्नशील असते. आणि तो शक्यतो २ ते ६ टक्क्यांच्या मध्ये म्हणजे ४ टक्क्यांचा आसपास असावा असं मध्यवर्ती बँकेचं धोरण असतं. (Retail Inflation Rate)
आणि असा तो नियंत्रित राहण्यासाठीच मध्यवर्ती बँक (central bank) रेपोदराचं शस्त्र वापरत असते. मागचं दीड वर्ष रिझर्व्ह बँकेनं रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. मार्च महिन्यात महागाई दर कमी होण्यामध्ये फळं, भाज्या आणि अन्नपदार्थांच्या किमती कमी होणं हे महत्त्वाचं कारण आहे. कारण, अन्नपदार्थांचा महागाई दर मार्च महिन्यात ८.५२ टक्क्यांवर खाली आला आहे. फेब्रुवारी महिन्यातही तो ८.६६ टक्क्यांवर होता. (Retail Inflation Rate)
(हेही वाचा- Loksabha Election 2024: निवडणुकांच्या तोंडावर खिश्याला गळती; डाळींसह फळे महागली)
डाळींच्या किमती मात्र अजूनही वाढतायत. येणाऱ्या दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती अजूनही वाढण्याची शक्यता आहे. आणि तिथे खरी मेख आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. आणि अशा भूराजकीय संकटांचा पहिला परिणाम इंधनांच्या किमतीवर होत असतो. त्यामुळे सध्या महागाई दर आटोक्यात असला तरी येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा पावसाची अनिश्चितता आणि इंधनाचे दर याचा परिणाम किंमतींवर होऊ शकतो. (Retail Inflation Rate)