Retail Inflation : देशाचा किरकोळ महागाई दर १२ महिन्यांतील नीच्चांकावर

Retail Inflation : मे महिन्यात किरकोळ महागाई दर ४.७५ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

84
Retail Inflation : देशाचा किरकोळ महागाई दर १२ महिन्यांतील नीच्चांकावर
  • ऋजुता लुकतुके

देशाचा किरकोळ महागाई दर मे महिन्यात ४.७५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. सांख्यिकी विभागाने बुधवारी किरकोळ महागाई दर आणि औद्योगिक उत्पादनाचे आकडे जाहीर केले. त्यानुसार, महागाई दर १२ महिन्यातील नीच्चांकी स्तरावर आहे ही जमेची बाजू आहे. हा दर ५ टक्क्यांच्या आत असावा हे रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्टं पूर्ण करणारा हा आकडा आहे. मागच्या एप्रिल महिन्यात हा दर ४.८३ टक्के इतका होता. (Retail Inflation)

यापूर्वी मे २०२३ मध्ये महागाई दर ४.३१ टक्के इतका होता. त्यानंतर पुढील १२ महिन्यातील हा नीच्चांकी दर आहे. अन्नधान्याचा महागाई दर मात्र अजूनही चढाच आहे. मे महिन्यात हा दर ८.६९ टक्के इतका आहे. एप्रिल महिन्यात तो ८.७ टक्के इतका होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या तिमाही पतधोरणात मध्यवर्ती बँकेनं आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी महागाई दर ४.५ टक्के असेल असा अंदाज वर्तवला होता. (Retail Inflation)

(हेही वाचा – उबाठा नेत्यांनी स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला; Nitesh Rane यांचे टिकास्त्र)

महागाई दरातील ही कपात इंधनाच्या आणि ऊर्जेच्या घटलेल्या किमतीमुळे शक्य झाली आहे. पण, अन्नधान्याच्या किमती अजूनही चढ्याच असल्यामुळे महागाई दरात म्हणावा तसा फरक पडला नाहीए. महागाई दरात झालेली ही घट आश्चर्यकारक आहे असा सूर अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘महागाई दर १२ महिन्यांतील नीच्चांकी असेल असा अंदाज नव्हता. त्यामुळे हा सुखद धक्का आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्राने यावेळी तारलं आहे. पण, अन्नधान्याच्या किमती अजूनही धोक्याची घंटा वाजवत आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाला तर येत्या काही महिन्यात सकारात्मक बदल घडू शकेल,’ असं आयसीआरए या क्रेडिट रेटिंग संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या. (Retail Inflation)

औद्योगिक उत्पादनाचे आकडेही जाहीर झाले आहेत. पण, मे महिन्यातील उत्पादन हे ५ टक्क्यांवर आलं आहे. एप्रिल २०२४ मध्ये उत्पादनाचा दर हा ५.४ टक्के होता. (Retail Inflation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.