- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय (Retirement Age) ६० वर्षे करण्याची मागणी पुन्हा एकदा सरकारकडे केली आहे. महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना याबाबत पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे. महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी सांगितले की, निवृत्ती वय (Retirement Age) ६० वर्षे करण्यासाठी मंत्रीमंडळाकडे शिफारस करण्यात आली होती, मात्र शासनाकडून होणारी दिरंगाई आणि विलंब अत्यंत निराशाजनक आहे.
(हेही वाचा – Electricity Bill : यंदा वीज बिल कमी होणार? महावितरणचा दर कपातीचा प्रस्ताव )
महाराष्ट्र शासनातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय (Retirement Age) ६० वर्षे असले तरी, राज्य शासनाच्या पातळीवर हे वय ५८ वर्षे आहे. या बाबीवर लक्ष वेधताना महासंघाने म्हटले आहे की, यापुढे केंद्र शासन आणि इतर राज्यांमध्ये ६० वर्षे निवृत्तीचे वय (Retirement Age) लागू आहे. या बदलामुळे शासकीय कर्मचार्यांच्या सेवा अधिक सक्षम होतील, तसेच शासनावर तातडीचा आर्थिक भार कमी होईल. महासंघाने या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा दिला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार निवृत्ती वय ६० करण्यामुळे राज्याच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community