वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढले

31 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी 62 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

83

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे निर्णय?

सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची नितांत आवश्यकता आहे. त्यांचा अनुभव साथरोग नियंत्रणात महत्वाचा ठरू शकतो. याचा विचार करुन शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट-अ आणि वरिष्ठ अधिकारी(वेतनस्तर एस-23: 67700-208700 व त्यावरील) तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ(वेतनस्तर एस-20 : 56100-177500) यांचे निवृत्तीचे वय 31 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी 62 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचाः खुशखबर… लवकरच एमपीएससीतर्फे पदांची भरती होणार)

या निर्णयास कार्योत्तर मंजुरी देण्याचा तसेच त्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 10 मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एमपीएससीतर्फे पदांची भरती

‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट-अ ची 4 हजार 417 पदे, गट-ब ची 8 हजार 31 पदे आणि गट-क ची 3 हजार 63 पदे, अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पदभरती अधिक गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे, भरणे यांनी सांगितले.

(हेही वाचाः राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.