Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा

गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे

114
Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा
Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा

देशभरात मान्सून परतीच्या मार्गावर (Maharashtra Rain) आहे. अनेक राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. उत्तरेकडील काही राज्यात थंडीची चाहूल लागली आहे, तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा (october hit) तडाखा जाणवू लागला आहे. विदर्भात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात चांगलाच उकाडा जाणवत आहे.

ऑक्टोबरमधील वाढत्या उष्म्याचा तडाखा वर्ध्यातही जाणवत आहे. वर्धा जिल्ह्यात आधीपासून उष्ण तापमान असताना ऑक्टोबर हिटमुळे येथील उष्णतेत अजूनच वाढ झाली आहे. वर्ध्याचे तापमान ३६ अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागल्या असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

(हेही वाचा – Indian Air Force Day : हवाई दलाचा नवीन ध्वज झळकला )

तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सून देशभरातून परतीच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा अजून वाढण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.