टाकाऊपासून टिकाऊ : महापालिका विद्यार्थ्यांचे ऑनलाईन कौशल्य

115

मुंबई महापालिकेच्या शाळा या अद्यापही प्रत्यक्षात सुरु झाल्या नसल्याने अनेक शाळांमधील मुलांना आपल्या कलागुणांना न्याय देता येत नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना आता महापालिकेने ऑनलाईनच्या माध्यमातून कार्यशाळा भरवून न्याय देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या कार्यानुभव विभागातर्फे भरवण्यात आलेल्या या कार्यशाळेत मुलांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून आपल्या कलागुणांचे कौशल्य दाखवले.

एकूण ४५० मुलांनी सहभाग घेतला

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यानुभव विभागातर्फे २ दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा कांदिवली, बोरीवली आणि दहिसर या विभागात पार पडली. या कार्यशाळेत तीन ३ विभाग सहभागी झाले होते. त्यात एकूण ४५० मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू, फुले बनवून त्याची सजावट करणे, बॉक्स बनवणे तसेच ओरीगामी वस्तू बनवणे, असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत शाळा बंद पण शिक्षण मात्र सुरू, याची प्रचिती पुन्हा एकदा या कार्यक्रमातून दिसून आली.

(हेही वाचा भूमिगत कचरा पेट्या अडकल्या युटीलिटीजच्या जाळ्यात!)

या कार्यशाळेसाठी प्रभारी शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी पश्चिम उपविभाग सुजाता खरे, अधिक्षक अशोक मिश्रा तसेच कार्यानुभव विभाग निर्देशिका तृप्ती पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशासकीय अधिकारी दिपीका पाटील, कल्पना संखे आणि शोभा वडियार यांनी या कार्यशाळेत मुलांना मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख भार्गव मेहता, उपकेंद्र प्रमुख कुशल वर्तक तसेच विषयाचे वरिष्ठ शिक्षक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले होते, तर कार्यक्रमाचे निवेदन शिक्षिका रूपाली बारी व मयुरी पवार यांनी केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.