Sanjay Malhotra आरबीआयचे नवे गव्हर्नर; ११ डिसेंबरला स्विकारणार पदभार

122
Sanjay Malhotra आरबीआयचे नवे गव्हर्नर; ११ डिसेंबरला स्विकारणार पदभार
Sanjay Malhotra आरबीआयचे नवे गव्हर्नर; ११ डिसेंबरला स्विकारणार पदभार

सरकारने महसूल सचिव संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra)यांची भारतीय रिझर्व्ह बँकचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. ते आरबीआयचे २६ वे गव्हर्नर असतील आणि सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांची जागा घेतली आहे. (Sanjay Malhotra)

( हेही वाचा : ‘मेक इन इंडिया’पाठोपाठ Wed In India देणार पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला बळ; पंतप्रधानांनी दिला तरुणांना सल्ला

दि. १२ डिसेंबर २०१८ रोजी शक्तीकांत दास यांना आरबीआयचे (RBI) गव्हर्नर करण्यात आले होते. त्यानंतर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता. मात्र आता दास यांच्या जागी संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांची भारतीय रिझर्व्ह बँकचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत संजय मल्होत्रा?

संजय मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे १९९० च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी शिक्षण घेतलं आहे. तसेच त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाबाबतची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.(Sanjay Malhotra) संजय मल्होत्रा(Sanjay Malhotra) ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. ते मूळचे राजस्थानचेच आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.