-
प्रतिनिधी
भारतातील आघाडीची बायोमेडिकल संस्था हाफकीन (Haffkine Institute) सध्या आर्थिक अडचणीत सापडली असून, तिच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी संस्थेला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, पुढील सहा महिन्यांत मोठे सकारात्मक बदल दिसतील, असे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार
हाफकीन संस्थेला (Haffkine Institute) पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली जाणार आहे. संस्थेला तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.
हाफकीन संस्थेचे महत्त्व
हाफकीन संस्था (Haffkine Institute) ही भारताच्या आरोग्यसेवेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोरोना काळातही संस्थेने मोठे योगदान दिले होते. ही संस्था माफक दरात उच्च प्रतीची आरोग्यवर्धक उत्पादने निर्माण करते आणि त्यांची निर्यात ४५ हून अधिक देशांमध्ये केली जाते. पोलिओ निर्मूलनासाठी संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य केले आहे. मात्र, २०१८-१९ पासून संस्थेच्या आर्थिक स्थितीत मोठी घसरण झाली आहे.
(हेही वाचा – “दोन मुलं एकत्रित येऊन हिंदीत बोलतात हे दुर्दैव” ; Raj Thackeray यांचं विधान)
संस्थेचे नूतनीकरण आणि नवीन योजना
हाफकीन संस्थेला (Haffkine Institute) तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. BSL-3 सुविधा (Biosafety Level-3 Facility) स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. ही सुविधा उभारल्यास, Unicef च्या मागणीनुसार n-OPV लस तयार करता येईल. यामुळे संस्थेच्या निर्यात क्षमतेत मोठी वाढ होऊन जगभरातील बाजारपेठेत हाफकीनचा दबदबा निर्माण होईल.
संशोधन व विकास केंद्राची उभारणी
संस्थेच्या भविष्यातील वाढीसाठी उच्चस्तरीय संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. यामुळे वैज्ञानिक संशोधन, नवीन लस आणि औषधनिर्मितीच्या दृष्टीने मोठी प्रगती साधता येईल. भविष्यात कोरोना किंवा तत्सम संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित लसींच्या संशोधनासाठीही हाफकीन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांचे आश्वासन
हाफकीन संस्थेच्या (Haffkine Institute) सुधारण्याबाबत आश्वासन देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, “हाफकीन ही भारताची अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. आम्ही तिचे पूर्वीचे वैभव परत मिळवून देणार आहोत. पुढील सहा महिन्यांत तुम्हाला चमत्कार दिसेल. आम्ही ही संस्था तोट्यातून नफ्यात आणणार आहोत.”
(हेही वाचा – आदिवासी भागाच्या विकासाकरीता कौशल्य शिक्षण महत्वाचे ; मंत्री Nitin Gadkari यांचे विधान)
नागरिकांचे आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य
हाफकीन संस्थेच्या (Haffkine Institute) नूतनीकरणामुळे भारतीय आरोग्य क्षेत्रात मोठी सुधारणा होणार आहे. संस्थेची उत्पादने अधिक चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि नवीन संशोधनामुळे नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळू शकेल.
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या पुढाकारामुळे हाफकीन संस्था पुन्हा नफ्यात येण्याची आशा निर्माण झाली असून, आरोग्य क्षेत्रातील हा मोठा बदल ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community