डिजिटल आणि AI च्या साहाय्याने Archives Department चे होणार पुनरुज्जीवन

174

राष्ट्रीय पुरालेखपाल समितीची (NCA),सत्तेचाळीसावी बैठक, 19 मार्च 2024 रोजी श्रीनगर येथील शेर-ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे आयोजित करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील प्रतिनिधींनी वैयक्तिकरित्या सहभाग घेतला होता, तर हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रतिनिधी दृकश्राव्य पद्धतीने या बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा Baramati Lok sabha constituency : शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट; थोपटे म्हणाले, अजून भूमिका घेतली नाही; दोन्ही पवारांची धाकधुकी वाढली…)

दोन दिवस सुरू असलेल्या या बैठकीदरम्यान, प्रतिनिधींनी आपापल्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांतील अभिलेखागार प्रशासन (Archives Department) आणि अभिलेखागार व्यवस्थापन प्रणालीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि त्यासाठी डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेण्याची गरज अधोरेखित केली. राष्ट्राच्या समृद्ध वारशाच्या दस्तावेजांचे जतन आणि सामायिकीकरण करण्यासाठी आणि वेब-पोर्टलद्वारे त्यांचे संग्रहण करून ही संसाधने सहज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित दृष्टिकोन स्वीकारण्यावर सर्वांनी यावेळी सहमती दर्शविली. प्रतिनिधींनी अभिलेखांच्या (Archives Department) डिजिटायझेशनच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक कार्यप्रणाली (SOPs) तयार करण्यासाठी नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडियाचे मार्गदर्शन मागितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.