पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी फरार आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करुन ईडीने आतापर्यंत 1 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये काळा घोडा येथील रिदम हाऊस, म्युझिक स्टोअर असलेली इमारत, नेपन्सी रोड फ्लॅट, कुर्ला येथील कार्यालयीन इमारत आणि दागिने यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी नीरव मोदीच्या संपत्तीचे लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी लिक्विडेटरची नियुक्ती केली आहे.
लिलावाची रक्कम बॅंकेला देण्यात येणार
नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेचे तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज चुकवले होते. त्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोदीची २६०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीने यापैकी काही मालमत्तांचा आधीच लिलाव केला असून उर्वरित मालमत्ता लिलावासाठी बँकेला देण्याच्या प्रक्रिया सुरू आहे.
( हेही वाचा: आता नितेश राणे म्हणतात, भंगारात आढळणारी ही प्रजाती ओळखा पाहू! )
प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरु
यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. तपास यंत्रणेने मोदींच्या मालकीच्या कार, पेंटिंग्ज आणि इतर महागड्या वस्तूंचा लिलाव करून यापूर्वी वसूल केलेले सुमारे ६ कोटी रुपये पीएनबीला सुपूर्द केले आहेत. नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात असून त्याला भारतात प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community