रिचाने नवरा केला अली, तिची बुद्धी भ्रष्ट झाली…केला भारतीय सैनिकांचा अवमान

४ ऑक्टोबर २०२२ रोजी अभिनेत्री रिचा चड्डा हिने मुसलमान अभिनेता अली फझल याच्याशी विवाह केला, त्यानंतर अवघ्या दीड महिन्यानंतरच रिचा चड्डाची मानसिकता भारतद्वेषी बनली आहे, याचे प्रमाण तिने केलेल्या ट्विटवरून मिळाले आहे. तिने थेट भारतीय सैनिकांची खिल्ली उडवणारे ट्विट केले. तिचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल होत असून सोशल मीडियात रिचा चांगलीच ट्रोल होऊ लागली आहे. काही जण ‘रिचाने नवरा केला अली, तिची बुद्धी भ्रष्ट झाली’, असेही टोमणे मारत आहेत.

काय आहे प्रकरण? 

दोन दिवसांपूर्वी भारताचे सैन्याधिकारी लेफ्ट. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी महत्वाचे वक्तव्य केले. ‘आम्ही पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यास सक्षम आहे. आम्ही सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहोत. पाकिस्तान काही कृती करण्याआधीच आम्ही आमचे ऑपरेशन पूर्ण करू’, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर रिचा चड्डा हिने ‘गलवान से हाय’ अर्थात ‘गलवान आठवण करत आहे’. अशा प्रकारे रिचाने थेट भारतीय सैनिकांची खिल्ली उडवली आहे. गलवानचा उल्लेख करून रिचाने भारतीय सैनिकांच्या क्षमतेची चेष्टा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचा ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून सुषमा अंधारेंनी म्हटले ‘बिस्मिल्ला ए रेहमान ए रहीम…’  )

सोशल मीडियात होतेय ट्रोल

दरम्यान रिचाने केलेल्या या खोडसाळपणाचे विश्लेषण करताना ज्योत जीत यांनी ट्विट करून याचा संबंध रिचाने ज्या अली फझलशी निकाह केला आहे, याच्याशी लावला आहे. जीत यांनी म्हटले आहे की, पॅटर्न को समझो, ४ ऑक्टोबर २०२२ रोजी रिचा चड्डाने अली फझलसोबत विवाह केला, २३ नोव्हेंबर २०२२ रोजी रिचा चड्डा उघडपणे भारतीय सैनिकांची खिल्ली उडवत आहे, बाकी तुम्ही समजदार आहात.

(हेही वाचा उद्धवा अजब तुझी सेना! आजोबांनी केला होता परप्रांतीयांना विरोध, नातवाचे मात्र लोटांगण)

तर दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विट करत, ‘आपण रिचाच्या विरोधात मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कुणालाही आपल्या सैनिकांचा अवमान करण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस तिच्यावर कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.

संदीप शिंदे म्हणाले की, जेव्हा ती ‘चड्डा’ होती तेव्हा ती चांगली होती. ज्याक्षणी ती ‘अली’ बनली आणि तिचे असे वर्तन सुरु झाले. लव्ह जिहाद, अँटी नॅशनॅलिसम!

तर कडक नावाने ट्विटर हॅण्डल असल्यानी म्हटले की, डिसेंबर महिन्यात रिचा आणि अली फझल यांचा ‘फुकरे ३’ हा चित्रपट येत आहे, तेव्हा तुम्हाला माहित आहे ना काय करायचे आहे? असे सांगत या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचे सुचवले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here