Mumbai Crime : २ महिन्याच्या बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक; महंमद आसिफ खानने केला होता ५ लाखांचा सौदा

94

गोरेगावमधील रस्त्यावरून दोन महिन्यांच्या मुलाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली ऑटोरिक्षा चालक आणि त्याच्या दोन पत्नींना रविवार, १० मार्च या दिवशी अटक करण्यात आली. बाळ विकण्यासाठी त्यांना ५ लाख रुपयांची ऑफर देणाऱ्या एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी (Mumbai Crime) सांगितले की, त्यांनी मुंबई परिसरातील ११ हजार ऑटोरिक्षांच्या तपशीलाचे विश्लेषण केले आणि एक लाख मोबाईल क्रमांकांचा तपास केला.

(हेही वाचा – WFI Ban Lifted : क्रीडा मंत्रालयाने कुस्ती फेडरेशनवरील बंदी हटवली, संजय सिंग यांच्याकडे सूत्र)

हे बाळ गुजरातमधील व्यापाऱ्याचे तिसरे मूल आहे. हा व्यापारी त्याच्या पत्नीसह बेडशीट विकण्यासाठी त्यांचे गुजरातमधील मूळ गाव ते मुंबई असा प्रवास करतो. २ मार्च या दिवशी गुजरातला परतण्यासाठी त्यांची ट्रेन चुकली आणि त्यांनी गोरेगाव (पूर्व) येथील बस थांब्यावर आश्रय घेतला. सकाळी ७.३० च्या सुमारास ते जागे झाले आणि त्यांना बाळ बेपत्ता असल्याचे आढळले. त्यांनी वानराई पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली.

वानराई पोलिसांच्या तपासात पहाटे 4 वाजता बाळाचे अपहरण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून आढळले. हा तपास डी.सी.पी. स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्या म्हणाल्या, “हे प्रकरण आव्हानात्मक होते; कारण अपहरणकर्त्याने पिवळे जॅकेट घातले होते आणि तो नवीन ऑटोरिक्षा चालवत होता, असे आम्हाला केवळ दोन धागेदोरे मिळाले होते.”

”या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली. त्यांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथून ऑटोरिक्षांची माहिती मिळवली आणि पश्चिम उपनगरात धावणाऱ्या तुलनेने नवीन वाहनांची यादी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या ऑटोरिक्षावर स्टिकर्स आणि एक विचित्र लिखाण होते. असे वाहन कोणी विकले आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही विक्रेत्यांशी संपर्क साधला”, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सहा दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी राजू मोरे (वय ४७ वर्षे) याचा मालवणीतील झोपडपट्टीत शोध लागला. बाळ त्याच्या घरी सापडले. मोरे याने पोलिसांना सांगितले की, त्यांच्या दोन बायका देखील या गुन्ह्यात सहभागी होत्या. फातिमा शेख (वय ३७ वर्षे) अपहरणासाठी त्याच्यासोबत होती, तर मंगल मोरे (वय ३५ वर्षे) घरी बाळाची काळजी घेत होती. मूल-बाळ नसल्याने हे मूल चोरल्याचा दावा मोरे याने सुरुवातीला केला; परंतु पोलिसांना आढळले की, ४२ वर्षीय महंमद आसिफ खान या एजंटने फातिमाला बाळासाठी ५ लाख रुपयांची ऑफर दिली होती.

गुन्ह्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मोरे आणि त्याच्या दोन बायका यांना ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक राजू माने, उपनिरीक्षक इंद्रजीत भिसे आणि अजित देसाई आणि साहाय्यक निरीक्षक प्रवीण टुपारे यांच्या पथकाने हा तपास केला. (Mumbai Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.