रिक्षा चालक कित्येक वेळा जास्तीच्या भाडेदराची प्रवाशांकडून मागणी करतात. कोरोना काळात वाहतूक सुविधा सुरळीत नसल्याने रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालू होता. कल्याण डोंबिवलीच्या आरटीओने अशा जास्तीच्या भाडेदराची मागणी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करायचे ठरवले आहे. कल्याण डोंबिवली आरटीकडे रिक्षा चालकांविरोधात प्रवाशांच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
शेअर रिक्षाचे भाडे जाहीर केले नाही
गेल्या वर्षीचं मीटरने प्रवास करणाऱ्या प्रवांशाचे भाडे निश्चित केले होते. परंतु शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी भाडे निश्चिती करण्यात आली नव्हती. याचा गैरवापर करून रिक्षा चालक प्रवाशांची जास्तीचे दर आकारून लूट करत असल्याच्या तक्रारी कल्याण डोंबिवलीच्या आरटी विभाकडे दाखल करण्यात आल्या.
( हेही वाचा : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा…ऑफलाईन होणार परीक्षा! )
तक्रार करण्यासाठी क्रमांक जारी
कल्याण डोंबिवली आरटीने यासंदर्भात निर्णय घेत प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी तक्रार क्रमांक जारी केला आहे. जास्तीचे प्रवासी भाडे घेतल्यास संबंधित रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई केली जाईल. प्रवासी रिक्षा भाडय़ा संदर्भात प्रवाशांना काही तक्रारी असल्यास त्यांनी ९४२३४४८८२४ या व्हॉटस्अप नंबर संपर्क साधावा असे आवाहन आरटीओकडून करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community