सीएनजीच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी चालक 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला असल्याचे मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने स्पष्ट केले आहे. या बैठकीत टॅक्सी भाड्यात 3 तर रिक्षा भाड्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
( हेही वाचा: न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, हा लोकशाहीचा विजय – उद्धव ठाकरे )
सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने, मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालक 15 सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. 13 सप्टेंबरला उदय सामंत यांनी टॅक्सी रिक्षा युनियनची बैठक बोलावली होती. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला परंतु, शब्द न पाळल्याचा आरोप झाल्याने मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले.
त्याच पार्श्वभूमीवर आता 23 सप्टेंबरला उदय सामंत यांनी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनसह बैठक घेतली. या बैठकीत टॅक्सीच्या भाड्यात 3 तर रिक्षाच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली. ही वाढ 1 ऑक्टोबरपासून नवी भाडेवाढ लागू करण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे.
Join Our WhatsApp Community