रिक्षा प्रवास महागणार! 1 डिसेंबरपासून भाड्यात वाढ, मीटरप्रमाणेच भाडे आकारा RTO चे आदेश

वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. त्यानंतर आता रिक्षाचा प्रवास महागणार आहे. नाशिकमध्ये आता रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणार आहेत. त्यामुळे नाशिकमधील रिक्षा प्रवास महागणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

आरटीओच्या नव्या नियमांनुसार, प्रवासातील पहिल्या दीड किलोमीटरकरता २७ रूपये आकारले जाणार आहे. तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रूपये प्रवाशांकडून आकारण्याचे आदेश आरटीओने दिले आहेत. यासह रिक्षा चालकांनी रिक्षाचे मीटर पुन्हाः प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असल्याच्या सूचनाही दिल्या आहे. या नियामांचे पालन न केले गेल्यास प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा – कामाख्या देवीचा नवस फिटणार! गुवाहाटी दौऱ्याबाबत शिंदे गटातील ‘या’ आमदाराने म्हटले…)

नाशिकमध्ये याकरता प्रादेशिक परिवहन विशेष पथके कार्यरत असणार आहे. तर करण्यात आलेल्या भाडेवाढीवर रिक्षा चालक नाराजी व्यक्त करत आहे. दुसरीकडे ही भाडेवाढ कमी असून शासनाने आणखी २० टक्के वाढ करून द्यावी अशी मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात येत आहे.नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२२ पासून रिक्षेच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात १ डिसेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यावर कारवाईही केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here