स्थानिक प्रशासन झाले सक्रिय
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील रिषभ पंत याने सांगितलेले कारण मान्य केले. रविवारी रुग्णालयात रिषभ पंतची भेट घेतल्यानंतर पुष्कर सिंग धामी यांनी ही माहिती दिली. यासोबतच महामार्गाची सर्व्हिस लेनही अद्याप तयार झालेली नाही, अशा स्थितीत अपघात होणे स्वाभाविक आहे. त्या ठिकाणाभोवती शेकडो अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, मात्र कोणीही काही करायला तयार नाही, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी अनेक अपघात झाले असून हे ठिकाण मृत्यूचे ठिकाण बनल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. जेव्हा वाहने वेगाने येतात तेव्हा लेन लहान असल्यामुळे वाहनचालकाला ब्रेक लावणे कठीण जाते. या परिस्थितीमुळे अखेर प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन)
Join Our WhatsApp Community