Pune Metro : पुणे मेट्रोच्या खर्चाचा वाढता आकडा ; केंद्र शासनाकडे पाठवला प्रस्ताव

243
Pune Metro : पुणे मेट्रोच्या खर्चाचा वाढता आकडा ; केंद्र शासनाकडे पाठवला प्रस्ताव
Pune Metro : पुणे मेट्रोच्या खर्चाचा वाढता आकडा ; केंद्र शासनाकडे पाठवला प्रस्ताव

पुणे मेट्रो (Pune Metro) १ प्रकल्पाचा खर्च सुमारे अडीच हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. या सुधारित खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली असून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

(हेही वाचा – Ambedkar Statue in SC : सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकरांचा पुतळा, रामदास आठवलेंकडून सरन्यायाधिशांचे अभिनंदन)

३३ किलोमीटरच्या दोन मार्गांसाठी मान्यता

पुणे मेट्रोच्या ३३ किलोमीटरच्या दोन मार्गांसाठी ११४२० कोटींच्या प्रकल्प आराखड्यात मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर बदलण्यात आलेले मार्ग, कोविड, जागांचे भूसंपादन, तसेच पुनर्वसनासाठीच्या खर्चात वाढ झाल्याने महामेट्रोकडून (Maha Metro) सुधारित खर्चाचा आराखडा शासनास सादर करण्यात आला होता. त्यास अखेर शासनाने मान्यता दिली असून त्याबाबत नगरविकास विभागाने (Department of Urban Development) नुकतीच अधिसूचना काढली आहे.

या वाढीव खर्चासाठी महामेट्रोकडून (Pune Metro) राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. राज्याच्या मंत्रिमंडळाने १४ डिसेंबर रोजी या निर्णयास मान्यता दिली होती. त्यानंतर शासनाकडून जवळपास दीड महिन्यानंतर याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.