वाढत्या दरामुळे काही महिन्यांपूर्वी टोमॅटो चर्चेत होते. आता रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या कोथिंबिरीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोथिंबिरीच्या जुडीच्या दरातही वाढ झाली आहे.
दररोजच्या स्वयंपाकात आवर्जून कोथिंबिरीचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात २० रुपयांना मिळणारी कोथिंबिरीच्या जुडीचा दर आता १०० रुपये झाला आहे. ठाणे शहरात रोज २० च्या आसपास कोथिंबिरीच्या गाड्या येतात. पावसामुळे कोथिंबिर खराब होते. यामुळे तिची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे, अशी माहिती होलसेल कोथिंबिरीचे विक्रेते भगवान तुपे यांनी दिली.
(हेही वाचा – Supreme Court : कौतुकास्पद! प्रथमच मूकबधिर वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केस लढवली)
किरकोळ बाजारात १०० रुपये…
नाशिक आणि पुण्यातून कोथिंबिरीची आवक होते. होलसेल बाजारात ५० ते ६० रुपयांना एक जुडी विकली जाते, तर किरकोळ बाजारात १०० रुपये जुडीने कोथिंबिर विकली जात आहे. याआधी होलसेल बाजारात एक जुडी १० रुपयांना आणि किरकोळ बाजारात १५ ते २० रुपयांना विकली जात होती. सणवार जवळ आलेले असताना कोथिंबिरीच्या वाढलेल्या दरामुळे महिला नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community