धूम्रपानामुळे आरोग्यास कितीही गंभीर धोका निर्माण झाला तरीही, धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत घट झालेली नाही. भारतात १६ ते ६४ या वयोगटात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच जास्त धूम्रपान करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. जागतिक अहवालानुसार ३७ टक्के भारतीयांनी धूम्रपान सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु तरी, प्रत्यक्ष धूम्रपान सोडण्याचे प्रमाण कमी आहे.
कठोर अंमलबजावणी नाही
द इंटरनॅशनल कमिशन टू रिइग्नाइट द फाइट अगेन्स्ट स्मोकिंग या संस्थेच्या अहवालानुसार चीन आणि भारतातील १६ ते ६४ या वयोगटांतील ५० कोटींहून अधिक नागरिक तंबाखूचे सेवन करतात. जगभरात सुमारे १.१४ अब्ज नागरिक अद्यापही तंबाखूचे सेवन करतात. त्यामुळे दरवर्षी सुमारे ८० लाख नागरिकांचा मृत्यू होतो, तर २० कोटी लोकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जवळपास सर्वच देशात १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू, सिगारेट विकण्यास बंदी आहे. पण, या प्रतिबंधांची कठोर अंमलबजावणी केली जात नाही. म्हणूनच लहान मुलांमधील व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत चालले आहे.
( हेही वाचा : धक्कादायक! मुंबईत १४ हजार बालकांना कोरोनाचा विळखा! )
धूम्रपानामुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या अधिक
धूम्रपानामुळे ११ टक्के लोक जगभरात मृत्यूमुखी पडले आहे आणि त्यातले ५० टक्के लोक हे चीन, भारत, अमेरिका आणि रशिया देशातले आहेत. चीनमध्ये धूम्रपान करणार्यांमुळे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे यानंतर भारताचा क्रमांक लागतो. जगातील एकूण धूम्रपान करण्यांपैकी दुर्दैवाने ११ टक्के स्मोकर्स हे भारतात आहे. त्यातूनही पुरूषांची संख्या ही अधिक आहे.
Join Our WhatsApp Community