५ वर्षांखालील मुलांना ‘ही’ लस द्या; बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

132

लहान मुलांना वर्षभर फ्लू चा धोका असतो. हिवाळा आणि पावसाळ्यापूर्वी हा धोका अधिक असतो. त्यामुळे इन्फ्लूएन्झाची लस मुलांना देणे आवश्यक असल्याचे इंडियन अकॅडमी ऑफ पिडिअॅट्रिक्सतर्फे (आयएपी) स्पष्ट करण्यात आले आहे.

पाऊस सुरु होण्यापूर्वी मुलांचे लसीकरण पूर्ण करावे. त्यामुळे इन्फ्लूएन्झाच्या प्रसारास पोषक वातावरण तयार होण्यापूर्वी मुलांच्या शरीरात या आजाराविरुद्ध संरक्षण तयार होईल, असेही आयएपीकडून सांगण्यात आले आहे.

म्हणून मुलांना लस देणे गरजेचे

सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना इन्फ्लूएन्झाची लस देण्याच्या सूचना बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहेत. लहान मुलांना होणारा इन्फ्लूएन्झाचा संसर्ग अनेकदा काही गुंतागुंत निर्माण करण्याची शक्यता असते. ही लस दरवर्षी अद्ययावत होत असल्याने, ती तब्बल वर्षभर मुलांना फ्लूपासून संरक्षण देते. इन्फ्लूएन्झा विषाणू संसर्गामुळे फ्लू, नाक, घसा आणि फुफ्फुसांना संसर्ग होतो. मोठ्या माणसांमध्ये झालेला इन्फ्लूएन्झा काही दिवसांत बरा होतो. मात्र लहान मुलांमध्ये फ्लूचे रुपांतर न्युमोनिया, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे अशा गोष्टींतही होऊ शकते, त्यामुळे लशीचे संरक्षण उपयुक्त ठरते.

( हेही वाचा ४० बंडखोर आमदारांच्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, काॅन्स्टेबल आणि कमांडोंवर कारवाई! )

लसीमध्ये वेळोवेळी बदल केले जातात

इन्फ्लूएन्झाचा धोका टाळण्यासाठी सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना अशी लस देणे अत्यावश्यक आहे. विषाणूचे चार प्रकार असतात. त्यात सतत बदल होत असतात. त्यामुळे दरवर्षी कोणत्या प्रकारचा विषाणू आजार पसरवण्यास कारणीभूत ठरतो हे पाहून लशीमध्ये बदल केले जातात. त्यामुळे दरवर्षी ही लस अधिकाधिक सुरक्षित होत जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.