भारतामध्ये सध्या टोमॅटो फ्लूचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमध्ये या फ्लूचे प्रमाणा सर्वाधिक आहे. या आजाराबाबत केंद्र सरकारने सूचना जारी केल्या आहेत. यात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. याचे पालन करणे आवश्यक असून यामध्ये केंद्र सरकारने टोमॅटो फ्लूची लक्षणे आणि उपचारांबाबत माहिती दिली आहे.
( हेही वाचा : कोकणात २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी)
टोमॅटो फ्लूची लक्षणे
टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य संसर्ग असून त्यामध्ये टोमॅटोच्या आकाराचे फोड शरीरावर येतात. याची लक्षणे इतर व्हायरल इन्फेक्शन सारखीच असतात. यामध्ये ताप, पुरळ, सांधेदुखी, थकवा, सुजलेले सांधे, घसा खवखवणे यांचा समावेश होतो. तापाच्या दोन ते तीन दिवसांनंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ दिसू लागतात. मुख्यत: हे पुरळ तोंडात, जिभेवर आणि हिरड्यांवर येतात.
टोमॅटो फ्लूचा संसर्ग झाल्यास काय करावे?
- टोमॅटो फ्लूचा संसर्ग झाल्यास विलगीकरणात राहून आजार पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी.
- फोडांना हात लावू नये, असे केल्यास हात तातडीने धुवा.
- संसर्ग झाल्यास मुलांचे कपडे आणि भांडी हे सर्व वेगळं ठेवा
- पुरेसा आराम करा
- हा व्हायरस कशामुळे पसरत आहे किंवा या व्हायरसशी संबंधित माहिती अद्याप शास्त्रज्ञांना मिळालेली नाही.