यमुना नदीच्या (Yamuna River) शुद्धीकरणास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना (Delhi Deputy Governor V. K. Saxena) यांनी रविवारी दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) यमुना नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून भाजपा (BJP) आणि आम आदमी पक्ष (आप) आमनेसामने आले होते. (River Purification)
‘आमचे सरकार सत्तेत आले तर यमुना नदीची साफसफाई केली जाईल,’ असे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले होते. त्याप्रमाणे नदीच्या शुद्धीकरणास सुरुवात करण्यात आली असून ट्रॅश स्कीमर, वीड हार्वेस्टर आणि ड्रेज युटिलिटी क्राफ्ट मशीनच्या माध्यमातून नदीतील घाण काढली जात आहे. नदीचे प्रदूषण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे चार टप्प्यात व्यापकपणे ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती नायब राज्यपालांच्या कार्यालयाने देण्यात आली.
(हेही वाचा – Mahakumbh मध्ये आणखी एक विक्रम ; आतापर्यंत प्रयागराज विमानतळावर उतरली ६५० चार्टर्ड विमाने)
तीन वर्षांच्या आत यमुना नदीची (River) साफसफाई करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी विविध संस्था आणि विभागांच्या दरम्यान ताळमेळ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे विभाग आणि संस्था या मोहिमेत सहभागी होणार आहेत, त्यात दिल्ली जल बोर्ड, जलसंधारण आणि पूर नियंत्रण विभाग, दिल्ली महानगरपालिका (Delhi Municipal Corporation), पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि दिल्ली विकास प्राधिकरण यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – Yashasvi Jaiswal Injured : यशस्वी जयस्वाल रणजीचा उपांत्य सामना का खेळत नाही? )
असे होणार शुद्धीकरण
सर्वप्रथम नदीच्या प्रवाहातील कचरा आणि गाळ काढला जाईल त्यानंतर नजफगड नाला आणि इतर नाले व अन्य सर्व नाल्यांची सफाई केली जाईल. त्यापाठोपाठ शुद्धीकरणाची अन्य कामे हाती घेतली जाणार आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community