सिंधुदुर्गातील रिया बनल्या देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी एक नवा इतिहास रचला आहे. देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान रिया यांनी पटकावला आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं आहे. तसेच रिया यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील करण्यात येत आहे.

प्रविण ते रिया असा प्रवासsindhudurg

प्रविण वारंग ते रिया आवळेकर हा प्रवास खडतर असल्याचे रिया यांनी सांगितले आहे. पण प्रशासनाच्या मदतीमुळे हा प्रवास सुकर झाल्याचे रिया यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या तुळसुली गावातील प्रविण वारंग यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यामुळेच प्रविण यांनी शिक्षक व्हायचे ठरवले. शिक्षण घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाटगावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रविण यांनी शिक्षकाची नोकरी करायला सुरुवात केली.

(हेही वाचाः Zomato चे नाव बदलणार? काय होणार नवीन बदल)

पण प्राथमिक शिक्षणापासून डीए पर्यंतच्या शिक्षणापर्यंत आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना प्रविण यांच्या मनात होती. पण ते ही भावना कोणाला सांगू शकत नव्हते. अखेर ही घुसमट त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तृतीयपंथी कल्याणकारी बैठकीत जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना सांगितली. त्यानंतर त्यांना प्रशासनाकडून मदत करण्यात आली.

पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका

त्यानंतर 2019 मध्ये प्रविण यांनी सर्जरी केली. त्यानंतरही त्यांनी पुरुषाच्या वेशातच आपली शिक्षकाची नोकरी कायम ठेवली. 2022 मध्ये आपण तृतीयपंथी असल्याचे त्यांनी प्रशासनाला कळवले. त्यावेळी त्यांना प्रशासनाने योग्यप्रकारे समजून घेतले व प्रविण वारंगची रिया आवळेकर झाली. देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान देखील मिळवला. मात्र हा प्रवास सोपा नसल्याचेही रिया यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here